मासरंग येथे राज्यस्तरीय क्रिकेट स्पर्धेस प्रारंभ

 संगमेश्वर : मासरंग येथील राज्यस्तरीय क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन करताना सहदेव बेटकर व मान्यवर. (छायाचित्र : पपु सुर्वे, संगमेश्वर)
संगमेश्वर : मासरंग येथील राज्यस्तरीय क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन करताना सहदेव बेटकर व मान्यवर. (छायाचित्र : पपु सुर्वे, संगमेश्वर)

देवरुख - संगमेश्वर तालुक्यातील मासरंग येथील श्री अंबादेवी क्रीडा मंडळातर्फे सलग २७ व्या वर्षी आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय क्रिकेट स्पर्धेला आजपासून सुरुवात झाली. स्पर्धेचे उद्घाटन जिल्हापरिषद सदस्य सहदेव बेटकर यांच्या हस्ते करण्यात आले. सलग २७ वर्षे सुरु असलेली संगमेश्वर तालुक्यातील ही एकमेव स्पर्धा आहे.

स्पर्धेत मुंबई, ठाणे, चेंबूर, रत्नागिरी, चिपळूण आदी ठिकाणच्या नामवंत ३२ संघानी सहभाग नोंदवला आहे. आजपासून सुरु झालेली स्पर्धा गुरुवार २३ नोव्हेंबर पर्यंत चालणार आहे. स्पर्धेत ४ गटातील प्रत्येकी ८ संघात ३१ सामने खेळवले जाणार आहेत.

विजेत्याला रोख रुपये २१ हजार १ व फिरता चषक, उपविजेत्याला रोख रुपये ११ हजार १ व चषक तर तृतीय क्रमांकावर येणाऱ्या दोन्ही संघाना प्रत्येकी २५०१ व चषक देवून गौरवण्यात येणार आहे. स्पर्धेतील मालिकाविराला १००१, उत्कृष्ट गोलंदाज, फलंदाज, क्षेत्ररक्षक यांना प्रत्येकी रोख ५०१ तर प्रत्येक सामन्यातील सामनाविराला १५१ रुपये रोख आणि चषक देण्यात येणार आहे.

मासरंग खालची वाडीतील भव्य पटांगणावर आज सकाळी १० वाजता या स्पर्धेचे उद्घाटन शिवसेना तालुका संपर्क प्रमुख सहदेव बेटकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी डॉ. भगवान नारकर, सरपंच प्रतिभा ब्रीद, मंडळाचे अध्यक्ष सदानंद ब्रिद,  प्रतिष्ठित ग्रामस्थ कमलाकर ब्रीद, पपुशेठ  सुर्वे,  भालचंद्र ब्रिद,  सूर्यकांत ब्रिद, विश्वनाथ ब्रिद, माजी सरपंच सुभाष ब्रिद, दिनेश ब्रिद, बगाराम ब्रिद,  राजेंद्र ब्रीद उपस्थित होते. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com