वेळणेश्‍वर समुद्रकिनाऱ्याची स्वच्छता

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 7 ऑक्टोबर 2017

गुहागर - तालुक्‍यातील वेळणेश्‍वर येथील महर्षी परशुराम अभियांत्रिकी महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभागाने वेळणेश्वरचा समुद्रकिनारा स्वच्छ केला. राष्ट्रीय सेवा योजना दिनानिमित्त महाविद्यालय, ग्रामपंचायत वेळणेश्वर व महाराष्ट्र मेरीटाईम बोर्ड यांच्या संयुक्त विद्यमाने ही मोहीम राबविण्यात आली.

महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना युनिटमधील विद्यार्थी व प्रथम वर्ष विभागाचे विद्यार्थी असे १५० विद्यार्थी व ७ प्राध्यापक शिबिरात सहभागी झाले होते. वेळणेश्वर समुद्रकिनाऱ्यावरील ५० टन कचरा विद्यार्थ्यांनी उचलला. कोकणातील समुद्र किनाऱ्यांचे प्रदूषण असेच वाढत राहिले, तर त्यामुळे स्थानिकांच्या व पर्यटकांच्या आरोग्यास धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे शासनाबरोबरच एक सामाजिक बांधिलकी म्हणून किनारपट्टीवरील ग्रामपंचायतींनी लोकसहभागातून समुद्रकिनारे प्रदूषणविरहित ठेवण्यासाठी काम केले पाहिजे, असे मत महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डचे अधिकारी परदेशी यांनी व्यक्त केले. 

यावेळी राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी प्रा. औदुंबर पाटकर व इलेक्‍ट्रॉनिक व टेलिकम्युनिकेशन विभागाचे प्रा. विनोद साळुंखे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अविनाश चिंचोळकर, महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डचे अधिकारी श्री. परदेशी, रामदास नाटेकर, सरपंच नवनीत ठाकूर व ग्रामस्थ सहभागी झाले होते.

Web Title: ratnagiri news Velaneshwar beach cleanliness