व्हिस्टाडोम कोचमधून पाहिले भिजलेले कोकण

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 20 सप्टेंबर 2017

रत्नागिरी -  कोणत्याही ऋतुत निसर्गरम्य कोकणात केलेली भटकंती नेहमीच लक्षात राहणारी आहे. गेले दोन दिवस पडणाऱ्या पावसाने कोकणातील हिरवाईला ओलेता साजही मिळाला आहे. कोकण रेल्वे मार्गावर धावणाऱ्या जनशताब्दीला प्रथमच जोडण्यात आलेल्या ‘व्हिस्टाडोम कोच’ मधून १७ प्रवाशांनी निसर्गरम्य कोकण पाहण्याचा आनंद लुटला. ही बोगी पाहण्यासाठी रत्नागिरीतील अनेक नागरिकांनी गर्दी केली होती.

मुंबईहून सुटलेल्या जनशताब्दी एक्‍स्प्रेसला व्हिस्टाडोम कोच लावला होता. मत्स्यमंत्री महादेव जानकर यांनीही याच डब्यातून प्रवास केला. सकाळी साडेअकरा ते बारा वाजण्याच्या सुमारास गाडी रत्नागिरी स्थानकात दाखल झाली. कोकण मार्गावरील निसर्गाचे सौंदर्य मनमुराद न्याहाळायला मिळावा व कोकण पर्यटनवाढीच्या दृष्टीने मदत व्हावी यासाठी मध्य रेल्वेने युरोपच्या व्हिस्टाडोम धर्तीची खास पारदर्शक सफरच प्रवाशांसाठी सुरू केली आहे. पारदर्शक डब्यातून आजूबाजूचे निसर्गसौंदर्य 
न्याहाळता येते.

कोकण रेल्वेमार्गावरचा प्रवास कोणत्याही ऋतुत, विशेषत: पावसाळ्यात डोळ्यांचे पारणे फेडणारा होता, अशी प्रतिक्रिया दीपा शिवलकर यांनी व्यक्‍त केली.
रत्नागिरी, सिंधुदुर्ग, गोवा पर्यटनवाढीसाठी हा डबा जोडला आहे. राज्यात प्रथमच कोकण रेल्वे मार्गावर हा उपक्रम सुरू केला आहे. काचेच्या मोठ्या खिडक्‍या या डब्याचं मुख्य आकर्षण आहे. १२ एलसीडी, एक फ्रिज, एक फ्रीजर, एक ओव्हन, एक ज्युसर ग्राईंडर, प्रवाशांच्या सामानासाठी जागा, निसर्ग पाहण्यासाठी स्वतंत्र जागा या डब्यात आहे. या डब्यात ४० सीट्‌स असून, त्या १८० टक्के रोटेबल आहेत आणि याचमुळे या डब्याला आणखीनच शोभा आली आहे. तिकिटाचे दर अव्वाच्या सव्वा आहेत. दादर ते चिपळूणसाठी १,२१५ रुपये, दादर ते रत्नागिरी १,४८० रुपये, दादर ते कणकवली १,८७० रुपये, दादर-थिवीम २,१२० रुपये, दादर-मडगाव २,२३५ रुपये मोजावे लागणार आहेत.

पावसामुळे कोकणातील निसर्गसौंदर्य उजळून निघाले आहे. त्याचा आनंद लुटण्याची संधी या निमित्ताने मिळाली.
- योगेश रेडीज, प्रवासी