रत्नागिरी : देवगड, रत्नागिरीच्या नावाखाली कर्नाटक हापूसची विक्री

अवकाळी पाऊस आणि हवामान बदलाचा परिणाम आंबा उत्पादनावर झाला आहे.
 आंबा
आंबाsakal

कळंबा: अवकाळी पाऊस आणि हवामान बदलाचा परिणाम आंबा उत्पादनावर झाला आहे. त्यामुळे हापूसच्या उत्पादनात घट झाली. दरम्यान, येथील बाजारपेठेत देवगड व रत्नागिरीच्या नावाखाली कर्नाटकचा हापूस व पायरी आंब्याची विक्री होत असल्याचे चित्र आहे. अक्षयतृतीयेनंतर बाजारपेठेत कोकणातून हापूस आंबा मोठ्या प्रमाणात विक्रीसाठी येईल.

आंब्याचा हंगाम मार्चपासून सुरू झाला आहे. परंतु कोकणातील हवामान बदलाचा फटका आंब्याला बसला आहे. त्यामुळे पहिल्या टप्प्यातील आंब्याची आवक बाजारामध्ये घटल्याचे दिसत आहे. अक्षय तृतीयासाठी राज्यभरातून आंब्याला मागणी वाढू शकेल असा आंबा बागायतदारांचा अंदाज आहे. मात्र अद्याप देवगड व रत्नागिरी हापुस आंब्याची पाच डझनाची एक पेटी चार ते पाच हजार रुपयांना विक्री होत आहे. किरकोळ बाजारात हापूस आंब्याचे दर नऊशे ते बाराशे रुपये प्रति डझन आहेत. रत्नागिरी, देवगड आणि पावस परिसरात समुद्री हवामान आणि मातीमुळे येथील हापुस आंब्याची चव गोड असते.

त्याचा रंग केशरी असतो. तसेच त्याचा गरही अधिक असतो. ग्राहकांमधून त्याला चांगली मागणी आहे. दरम्यान कळंबयासह जिल्ह्यातील बाजारपेठांमध्ये कर्नाटक मधील बेळगाव, कोलार, रामनगर, धारवाड यासह अनेक गावांमधून हापूस व पायरी आंबा विक्रीसाठी दाखल झाला आहे. त्याची देवगड व रत्नागिरी म्हणून विक्री केली जात असल्याचे दिसत आहे.

कोकणातील पावस, रत्नागिरी, देवगड, पूर्णगड येथून हापूस आंबा विक्रीसाठी जिल्ह्यामध्ये येतो. या आंब्याची पाच डझनची पेटी चार ते पाच हजार रुपयांना विक्री होत आहे. देवगड रत्नागिरीच्या हापूसचा देट खोल असतो. साल पातळ असते. आंबा कापल्यानंतर कापल्यानंतर गर केशरी रंगाचा दिसतो.चवीला खूप गोड असतो.

-पंडित पाटील आंबा बागायतदार, कळंबा (रत्नागिरी)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com