रत्नागिरीत जिल्हा परिषद शाळा सज्ज ; पुस्तकांचे सेट झाले दाखल

ratnagiri Zilla Parishad schools are ready
ratnagiri Zilla Parishad schools are ready

 रत्नागिरी : कोरोनामुळे यंदाचे शैक्षणिक सत्र लांबण्याची शक्यता असली तरीही जिल्हा परिषद शाळा सज्ज झाल्या आहेत. प्राथमिक शाळांमधील मुलांना मोफत पुस्तके वाटप करण्यात येतात. त्यासाठी जिल्ह्यात 6 लाख 71 हजार 495 पुस्तकांचे सेट दाखल झाले आहेत. त्यासाठी 2 कोटी 81 लाख 47 हजार 926 रुपयांचा निधी लागला. कोल्हापूर येथील एजन्सीकडून पुस्तके प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी पुरवण्यात आली आहेत. शाळा सुरू झाल्यानंतर पहिल्या दिवशी वाटप करता येणार आहेत.

कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू झाल्यामुळे गतवर्षी शैक्षणिक सत्रातील परिक्षांचा कालावधी पूर्ण झाला नाही. एक मार्चअखेर आणि एप्रिल असा सव्वा महिना शाळांना सुट्टी दिली गेली. अजूनही देशभरात कोरोनाचे थैमान सुरुच आहे. यामध्ये वयोवृद्ध आणि लहान मुले यांना कोरोनाचा सर्वाधिक धोका असल्याचे आरोग्य विभागाकडून स्पष्ट केले आहे. त्यामुळे शाळांचे 2020-21 चे शैक्षणिक सत्र कधी सुरू होणार यावर निर्णय प्रलंबित ठेवण्यात आला आहे. तरीही शाळा सुरू करण्यासाठी आवश्यक तयारी करण्याच्या सूचना शिक्षण विभागाकडून दिल्या आहेत. त्यानुसार जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागाने पुस्तके आणि शाळेचा युनिफॉर्मसाठी आवश्यक ती मागणी शासनाकडे केली होती.

त्यानुसार कोल्हापूर येथील एजन्सीकडून पुस्तके प्राप्त झाली आहे. त्या-त्या तालुक्यातील विषयतज्ज्ञ आणि शिक्षक यांनी कोल्हापूर येथूून पुस्तके आणण्याचे काम केले आहे. जिल्ह्यासाठी पावणेसात लाख विविध विषयांची पुस्तके लागणार होती. त्यानुसार 90 टक्के पुस्तके आणली गेली आहे. शासनाच्या निकषानुसार दरवर्षी शाळेच्या पहिल्या दिवशी पुस्तके आणि युनिफॉर्म जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांतील विद्यार्थ्यांना दिला जातो. यंदा तशी व्यवस्था करुन ठेवण्यात आली आहे. कोरोनामुळे पुस्तके वेळेत मिळतील की नाही याबाबत सांशकता होती; मात्र त्यावर मात करण्यात यश आले आहे.

 तालुका          पुस्तके          रक्कम (रुपये)

* रत्नागिरी   1,44,012    62 लाख 29 हजार

* चिपळूण    1,11,947    48 लाख 44 हजार

* मंडणगड       30,604   12 लाख 17 हजार

* खेड           67,955    29 लाख 45 हजार

* दापोली       56,441     15 लाख 02 हजार

* गुहागर        57,236     24 लाख 83 हजार

* संगमेश्‍वर     80,048     34 लाख 83 हजार

* लांजा         50,227     21 लाख 85 हजार

* राजापूर       73,025     31 लाख 56 हजार
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com