सापडलेली पर्स परत करणाऱ्या रवींद्र शिगवणांचा सत्कार

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 1 मार्च 2017

खेड - येथील बस स्थानक परिसरात वृद्ध महिलेची गहाळ झालेली पर्स रवींद्र शिगवण यांनी परत केली. याबद्दल त्यांचा पोलिस निरीक्षक अनिल गंभीर यांनी सत्कार केला. 

खेड - येथील बस स्थानक परिसरात वृद्ध महिलेची गहाळ झालेली पर्स रवींद्र शिगवण यांनी परत केली. याबद्दल त्यांचा पोलिस निरीक्षक अनिल गंभीर यांनी सत्कार केला. 

खवटी येथील सुनीता भोसले या बॅंकेतून पैसे काढून बस स्थानकाच्या मागील दुकानामध्ये वस्तू खरेदीसाठी गेल्या होत्या. त्या परतल्यानंतर बसस्थानकाजवळ ठेवलेली पिशवी गहाळ झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. या पिशवीमध्ये मोबाइल, आधारकार्ड व रक्कम होती. शिवाजीनगर येथील रवींद्र शिगवण यांना ही पिशवी तीन दिवसांपूर्वी आढळली. पिशवीमध्ये रोख रक्कम व अन्य साहित्य असल्याचे निदर्शनास आल्यानंतर ही बाब दीप्ती ऑईल ट्रेडर्सचे मालक मिलिंद इवलेकर यांच्या कानावर घातली. श्री. इवलेकर यांनी आधार कार्डवरील पत्त्यावरून खवटी येथील शेखर शेठ यांच्याकडे सुनीता भोसले या वृद्धेबाबत विचारणा करत गहाळ पिशवीबद्दल सांगितले. यानंतर येथील पोलिस ठाण्यात ही पिशवी देण्यात आली. शिगवण यांचा प्रामाणिकपणाबद्दल सत्कार करण्यात आला. या प्रसंगी उद्योजक मिलिंद इवलेकर, सहायक पोलिस निरीक्षक सचिन लाड, पोलिस उपनिरीक्षक आनंद पवार, विनोद आंबेरकर, शेखर शेठ, मनोहर चव्हाण, योगेश कदम आदी उपस्थित होते.

टॅग्स