पुरामुळे भातशेतीचे नुकसान

rice farm loss due to flood
rice farm loss due to flood

महाड : महाड तालुक्यात आलेल्या पुराच्या पाण्याने मोठया प्रमाणात भातशेतीचे नुकसान झाले आहे. नदीकिनारी असलेल्या आणि सखल भागात असलेल्या भातशेतात माती मिश्रीत पाणी आल्याने नुकतीच लावणी झालेली भात रोपे कुजण्याची शक्यता निर्माण झाली आहे. पुराच्या पाण्याने नुकसान होत असतानाच शहराजवळील महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या कामाने देखील पाण्याचा निचरा होत नसल्याने भातशेतात आलेली माती अडकून राहील्याने नुकसान झाल्याची तक्रार करंजखोल ग्रामस्थांनी केली आहे.

गेली आठवडाभर तालुक्याला मुसळधार पावसाने झोडपले. या मुसळधार पावसाने आलेल्या पुराच्या पाण्याने नदीकीनारी असलेल्या भात शेतात किमान चार दिवस पुराचे पाणी साचले. या पुराच्या पाण्याने यावर्षी चिखलाचे प्रमाण अधिक असल्याने नुकत्याच सुरू असलेल्या भातलावणीच्या रोपांचे नुकसान झाले आहे. भात लावणी अंतिम टप्प्यात असतानाच पुर आल्याने लावणीची कामे खोळंबली असतानाच शेतात आलेला चिखल शेतकऱ्याची डोकेदुखी ठरली आहे. भातशेतात आलेल्या चिखलाने नांगरणी करणे अवघड झाले आहे. शिवाय भात लावणी करणे देखील कठीण झाले आहे. महाड शहराजवळून गेलेल्या सावित्री, गांधारी, काळ नदीचे पाणी महाड, नाते रायगड परीसर, बिरवाडी, चांभारखिंड, गांधारपाले, वहूर,केंबुर्ली ,दासगाव,करंजखोल आदी गावांतील शेतकऱ्यांच्या भातशेतीचे नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणी डोंगरावरून आलेला मातीचा भराव भातशेतात आल्याने देखील नुकसान झाले आहे.

मुंबई गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या कामात भराव करण्यात आला आहे.या कामात टाकण्यात आलेल्या मोऱ्यांची कामे अर्धवट अवस्थेत असल्याने पाण्याचा निचरा होत नाही त्यातच डोंगर भागातून आलेली माती शेतातच अडकून राहीली आहे. यामळे भातशेतात लावलेली रोपे मातीमध्ये गाडली गेली आहेत. मोऱ्यांची कामे करण्याऐवजी स्लॅब टाकला जावा अशी मागणी ग्रामस्थांनी यापूर्वी केली होती. या नुसकानाबाबत महामार्ग बांधकाम विभाग आणि महामार्ग चौपदरीकरण कामातील ठेकेदार कंपनीकडे सविस्तर निवेदन या शेतकऱ्यांनी दिले आहे.

नदीकीनारी असलेल्या भातशेतात माती आणि चिखल साचल्याने भातशेतात लावणी केलेल्या भातरोपे कुजण्याची शक्यता आहे. महामार्गालगत चैपदरीकरणाच्या कामात चुकीच्या पद्धतीने मो-यांची कामे झाल्याने त्याचा फटका ग्रामस्थांना बसला आहे. 
- अशोक पोटसुरे, सरपंच करंजखोल

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com