गुहागरमधून आरपीआय निवडणूक रिंगणात - मारुती मोहिते

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 2 फेब्रुवारी 2017

गुहागर - तालुक्‍यातील रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) पक्षाने जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकीत उडी घेतली आहे.

आरपीआयने जिल्हा परिषदेच्या ४ गटांपैकी ३ जागा व पंचायत समितीच्या ८ गणांपैकी ६ जागांवर आपले उमेदवार जाहीर केले आहेत, अशी माहिती तालुका सरचिटणीस मारुती धोंडू मोहिते यांनी दिली.

गुहागर - तालुक्‍यातील रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) पक्षाने जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकीत उडी घेतली आहे.

आरपीआयने जिल्हा परिषदेच्या ४ गटांपैकी ३ जागा व पंचायत समितीच्या ८ गणांपैकी ६ जागांवर आपले उमेदवार जाहीर केले आहेत, अशी माहिती तालुका सरचिटणीस मारुती धोंडू मोहिते यांनी दिली.

पक्षाचे सर्वेसर्वा रामदास आठवले यांना मोदींनी केंद्रात राज्यमंत्री केले आहे. त्यामुळे आरपीआय निवडणुकीत उतरणार नाही अशीच सर्वांची अपेक्षा होती.  मात्र, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजप आणि शिवसेना एकही जागा सोडत नाही, चर्चा करीत नाहीत, किंमत देत नाहीत, अशी नाराजी पक्षातील कार्यकर्त्यांमध्ये होती. त्यामुळे गुहागर तालुका आरपीआयने निवडणुकीत उतरण्याचा निर्णय घेतला, असे मोहिते यांनी सांगितले.

गुहागर तालुक्‍यातील अंजनवेल गटातून शशिकांत जाधव, पालशेत गटातून संदीप पवार आणि पडवे गटातून विद्याधर राजाराम कदम यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. तसेच पंचायत समितीसाठी शिल्पा शशिकांत जाधव (पालशेत गण), सुनील महादेव गमरे (वेळणेश्वर), मानसी मनोहर पवार (कोतळूक), अनिल गंगाराम जाधव (खोदडे), दिलीप हिरामण मोहिते (पालशेत) यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. पडवे गणातील उमेदवार एक दोन दिवसांत जाहीर होईल. अंजनवेल आणि पाटपन्हाळे गणात आरपीआय निवडणूक लढविणार नाही. वेळणेश्वर जिल्हा परिषद गटात उमेदवार कोण द्यावा याचा निर्णय अद्याप झालेला नाही.

उमेदवार निवडून आणण्याची ताकद आमच्यात नसली, तरी विजयाकडे सरकणाऱ्या उमेदवाराला हरविण्याची ताकद आमच्यात निश्‍चित आहे. आजपर्यंत मित्रपक्ष संवाद साधतील म्हणून थांबलो होतो. मात्र, आता आम्हाला गृहीत धरून चालणार नाही ही बाब सर्वांनाच दाखवून देण्याची वेळ आहे. दहा वर्षांपूर्वी झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत ही बाब आरपीआयने दाखवून दिली आहे.

- संदीप कदम, तालुकाध्यक्ष, आरपीआय

Web Title: rpi in zilla parishad & panchyat committee election