वाहतूक नियम मोडणाऱ्यांकडून साडेतीन लाखांचा दंड वसूल 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 20 मार्च 2017

बेळगाव : जिल्हा पोलिसांनी विविध ठिकाणी गेल्या आठवडाभरात केलेल्या कारवायांमध्ये वाहतूक नियमांच्या उल्लंघनप्रकरणी एकूण 4008 प्रकरणे नोंदवून 3 लाख 45 हजार 300 रुपयांचा दंड वसूल केला. शिवाय बेकायदा वाळू वाहतूक, अबकारी कायद्याचे उल्लंघन आणि मटका प्रकरणांमध्येही मोठ्या प्रमाणात दंड वसूल झाला. 

जिल्ह्यात बेकायदा वाळू वाहतुकीची एकूण बारा प्रकरणे नोंदवली. या प्रकरणी एकूण 19 संशयितांना अटक झाली. छाप्यावेळी त्यांच्याकडून 47 हजार रुपयांची वाळू, तीन ट्रक, तीन बोटी, तीन ट्रॅक्‍टर, जेसीबी, दोन टिप्पर, तीन डिझेल इंजिन, ट्रेलर असा ऐवज जप्त करण्यात आला. मद्यपान करून वाहन चालविणाऱ्या 50 जणांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. त्यांच्याकडून एकूण 39 हजार 350 रुपये दंड वसूल केला. 

अबकारी कायद्याचे उल्लंघन करून मद्य वाहतुकीची एकूण 17 प्रकरणे नोंदवली. यामध्ये 13 संशयितांना अटक झाली. त्यांच्याकडून 34,995 रुपयांच्या विविध कंपन्यांच्या मद्याच्या बाटल्या जप्त केल्या. आठ दिवसांत विविध आठ ठिकाणी छापे घालून एकूण 14 संशयितांना अटक करण्यात आली. त्यांच्याकडून 14,785 रुपये जप्त केले. 

कोकण

रत्नागिरी - मुंबई-गोवा महामार्गावर सावर्डे आगवेजवळ आज (शुक्रवार) पहाटे बस उलटून भीषण अपघात झाला. या अपघातात दोन जण घटनास्थळीच...

09.33 AM

खोपोली - राज्यात शेतकऱ्यांची स्थिती बिकट होत आहे. पेरले तर उगवत नाही. उगवले तर...

04.48 AM

राज्य सरकारच्या पुढाकाराने पाणीटंचाई दूर करण्याचा प्रयत्न महाड - रायगड...

04.03 AM