जि.प. कर्मचारी संघटनेचे नेते नाईक यांचे निधन

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 26 डिसेंबर 2016

कणकवली : जिल्हा परिषद कर्मचारी संघटनेचे कोकण विभागीय नेते आणि जिल्हा परिषद चालक परिचर राज्यस्तरीय संघटनेचे संस्थापक अध्यक्ष रामचंद्र विश्राम ऊर्फ आर. व्ही. नाईक (वय 70) यांचे रविवारी पहाटे निधन झाले. कलमठ काशिकलेश्‍वर येथील निवासस्थानी हृदयविकाराचा झटका आला. त्यात त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या अंत्ययात्रेत लोकप्रतिनिधी, जि. प. कर्मचारी, विविध स्तरांतील मंडळी सहभागी झाली होती.

सिंधुदुर्ग जि. प.च्या सामान्य प्रशासन विभागातून अधीक्षक पदावरून 2004 मध्ये सेवानिवृत्त झाल्यानंतर आर.व्ही. नाईक हे कलमठ कलेश्‍वर नगर येथील निवासस्थानी राहत होते. सावंतवाडी तालुक्‍यातील आरोंदे गावचे मूळचे असलेले आर. व्ही. नाईक सावंतवाडी पं.स.मध्ये लिपिक पदावरून जि.प.च्या सेवेत रुजू झाले होते. त्यानंतर मालवण, चिपळूण, रत्नागिरी व त्यानंतर सिंधुदुर्गनगरी जि. प. मुख्यालय येथे विविध पदांवर कार्यरत होते.
जि.प. तसेच प्रशासकीय कारभाराचा त्यांचा गाढा अभ्यास होता. जि.प. कर्मचारी संघटनेची धुरा त्यांनी अनेक वर्षे यशस्वीरीत्या सांभाळली होती. संघटनेच्या माध्यमातून जि. प. कर्मचाऱ्यांनी केलेल्या अनेक आंदोलनांचे नेतृत्व त्यांनी केले होते. जि. प. कर्मचारी तसेच विविध क्षेत्रांमध्ये त्यांचा मोठा संपर्क होता. सेवानिवृत्तीनंतरही अनेकांना त्यांनी प्रशासकीय पातळीवर मार्गदर्शक म्हणून मोलाचे सहकार्य केले.

कणकवलीतील प्रसिद्ध वकील वीरेश नाईक यांचे ते वडील होत. त्यांच्या पश्‍चात पत्नी, मुलगा, मुलगी, सून, जावई, भाऊ, नातवंडे असा परिवार आहे. कणकवली मराठा मंडळजवळील स्मशानभूमीत रविवारी सायंकाळी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

कोकण

रत्नागिरी - जिल्ह्यातील कातळशिल्पांचे नोटीफिकेशन करुन ती संरक्षित करण्यासाठी राज्य व केंद्राच्या पुरातत्त्व अधिकाऱ्यांशी चर्चा...

03.36 PM

रत्नागिरी - राज्य उत्पादन शुल्कच्या भरारी पथकाने मोटारीच्या डिकीतून नेण्यात येत असलेल्या विदेशी मद्याच्या ३८४बाटल्या जप्त केल्या...

03.36 PM

राजापूर - तालुक्‍यातील माडबन येथे केंद्र शासनातर्फे उभारल्या जात असलेल्या जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पाचा विरोध मावळल्याचे सांगितले...

02.33 PM