स्वच्छ सर्वेक्षण समितीतर्फे सावंतवाडी शहरात पाहणी

सावंतवाडी - स्वच्छ सर्वेक्षणअंतर्गत दाखल झालेल्या समितीकडून गुरुवारी शहरात पाहणी करण्यात आली. या वेळी नागरिकांशी चर्चा करताना अधिकारी.
सावंतवाडी - स्वच्छ सर्वेक्षणअंतर्गत दाखल झालेल्या समितीकडून गुरुवारी शहरात पाहणी करण्यात आली. या वेळी नागरिकांशी चर्चा करताना अधिकारी.

सावंतवाडी - स्वच्छ सर्वेक्षण अभियानाच्या पार्श्‍वभूमीवर शहराचा आज सर्वेक्षण समितीच्या सदस्यांनी दौरा केला. यावेळी अनेक भागांची प्रकल्पाची पाहणी करण्याबरोबर त्यांनी लोकांना प्रश्‍न केले. एकीकडे परीक्षा सुरू असल्यामुळे एरव्ही सामाजिक कामात पुढे असलेले पालिका पदाधिकारी समितीच्या आसपासही फिरताना दिसत नव्हते. काही अधिकारी व कर्मचारी त्यांना भागाची माहिती करून देत होते.

शहराचे स्वच्छ सर्वेक्षण सुरू आहे. कालपासून ही प्रक्रिया सुरू झाली. यासाठी दाखल झालेल्या समितीच्या पदाधिकाऱ्यांनी शहरातील अनेक भागाची आज पाहणी केली. पालिकेकडून राबविण्यात आलेले प्रकल्प, कचऱ्याबाबत देण्यात येणारी सेवा, घंटागाड्या, ओला-सुका कचऱ्याचे वर्गीकरण आदी विविध प्रश्‍न त्यांनी विचारले. त्यांच्या प्रश्‍नांना नागरिकांकडून देण्यात येणारी उत्तरे त्यांनी ऑनलाईन फीड करून ठेवली आहेत; मात्र संबंधित अधिकाऱ्यांनी उपस्थित पत्रकारांशी बोलण्यास नकार दिला.

दुसरीकडे पालिकेचे पदाधिकारी तसेच अन्य नगरसेवक त्या समितीच्या आसपास सुध्दा दिसत नव्हते. याबाबत मुख्याधिकारी विजयकुमार द्वासे यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, ‘‘परिक्षेप्रमाणे ही प्रक्रिया सुरू आहे. त्यामुळे सर्व्हेक्षणाच्या नियमानुसार पाहणी आणि प्रश्‍नोत्तरादरम्यान त्याठिकाणी कोणी पदाधिकारी असू नये असा दंडक घालण्यात आला आहे. त्यामुळे कोणताही पदाधिकारी वा अधिकारी त्याठिकाणी उपस्थित नाही.’’

पदाधिकाऱ्यांकडून आचारसंहिता पालन
सर्वेक्षण समितीकडून पाहणी आणि प्रश्‍नोत्तरे सुरू असताना नगराध्यक्ष बबन साळगावकर, त्यांचे सहकारी नगरसेवक आणि मुख्याधिकारी शहरात फेरफटका मारताना दिसत होते. ज्याठिकाणी समिती आहे त्याठिकाणी येणे सर्वांकडून टाळले जात होते. त्यामुळे या सर्व प्रक्रियेत पदाधिकाऱ्यांनी आचारसंहिता पाळल्याचे चित्र होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com