सावंतवाडीत 15 कोटींचे आधुनिक मार्केट

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 1 सप्टेंबर 2016

सावंतवाडी - पालिकेच्या वतीने येथील संत गाडगेबाबा भाजी मंडईच्या ठिकाणी आधुनिक मार्केट उभारण्यात येणार आहे. हा प्रकल्प पंधरा कोटींचा असून, येत्या महिनाभरात याचे काम सुरू करण्यात येणार आहे, अशी माहिती नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी आज येथे दिली.
 
या मार्केटमध्ये सुसज्ज पार्किंग असून जास्तीत जास्त गाळेधारकांना सामावून घेण्यात येणार आहे. त्यात भाजी, फूल आदी विक्रेत्यांसह ग्रामीण भागातील विक्रेत्यांना सामावून घेतले जाणार आहे, असेही ते म्हणाले.
 
येथील पालिकेच्या मासिक सभेदरम्यान श्री. साळगावकर यांनी ही माहिती दिली.
 
ते म्हणाले, ‘येथील पालिकेच्या वतीने संत गाडगेबाबा भाजी मंडईच्या ठिकाणी हे मार्केट उभारण्यात येणार आहे. साडेचार हजार चौरस फूट जागेत हे बांधकाम होणार आहे. तीन मजले इमारत बांधण्यासाठी परवानगी मिळावी, यासाठी पाठपुरावा सुरू आहे.‘‘

श्री. साळगावकर म्हणाले, ‘आगामी काळात शहरातील वाहनांची वाढती संख्या लक्षात घेता अंडरग्राउंड पार्किंगसह अन्य एक मजला पार्किंगसाठी ठेवण्यात आला आहे. खालच्या मजल्यावर ग्रामीण भागातून येणाऱ्या लोकांसह स्थानिक फळ, भाजी आणि फुले विक्रेत्यांना जागा देण्यात येणार आहे. त्याचबरोबर वंचित गाळेधारकांना यात समाविष्ट करून घेण्यात येणार आहे. याचा फायदा येथील लोकांना व्हावा या दृष्टीने प्रयत्न सुरू आहेत. येत्या महिनाभरात हे काम सुरू करण्यासाठी प्रयत्न आहेत.‘‘

ते पुढे म्हणाले, ‘या मार्केटसाठी पंधरा कोटी खर्च अपेक्षित आहे. पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या प्रयत्नांतून पहिल्या टप्प्यात आवश्‍यक असलेले पाच कोटी रुपये मंजूर झाले आहेत. त्यामुळे हे काम आता युद्धपातळीवर सुरू करण्यात येणार आहे.‘‘

मल्टिप्लेक्‍स गुंडाळले
नव्याने उभारण्यात येणाऱ्या या मार्केटमध्ये मल्टिप्लेक्‍स उभारण्यात येणार आहे, अशी घोषणा नगराध्यक्ष साळगावकर यांनी काही दिवसांपूर्वी केली होती; मात्र आजच्या आराखड्यात ते दिसले नाही. याबाबत श्री. साळगावकर यांना विचारले असता पार्किंगचा प्रश्‍न लक्षात घेता त्यासाठी अन्य जागेचा पर्याय ठेवण्यात आला आहे. तूर्तास तरी येथे मल्टिप्लेक्‍स करणार नाही, असे त्यांनी सांगितले.

Web Title: Sawantwadi modern market of Rs 15 crore

टॅग्स