बेशिस्त पार्किंगमुळे सावंतवाडीत कोंडी

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 21 जुलै 2017

सावंतवाडी - शहरातील शासकीय गोदामलाला धान्य घेऊन येणाऱ्या ट्रकच्या बेशिस्त पार्किंगमुळे या मार्गावरील वाहनचालकांना वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागत आहे. याकडे वेळोवेळी आवाज उठवून पोलिस तसेच पालिका प्रशासन दुर्लक्ष करत आहेत, असा आरोप नागरिकांतून होत आहे.

शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असणाऱ्या शासकीय गोदामामध्ये दररोज धान्य घेऊन ट्रक येतात. हे गोदोम रस्त्यालगतच असल्याने तेथे पार्किग करण्यासाठी मोठी जागा उपलब्ध नाही. यातच काही ट्रक चालक गोडावून परिसरात बेशिस्त पद्धतीने ट्रक पार्किंग करतात. यामुळे या मार्गावरून ये-जा करणाऱ्या वाहन धारकांना याचा त्रास सहन करावा लागत आहे. या परिसरात महाविद्यालय आणि शाळा असल्याने वाहनांची मोठी वर्दळ असते. यामुळे नेहमीच याठिकाणी वाहतूक कोंडीची समस्या उद्‌भवते. पोलिस प्रशासनाने बेशिस्त ट्रक चालकांना लगाम घालून सर्वसामान्यांना होणारा त्रास कमी करावा, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे; मात्र पोलिस यंत्रणेकडून यावर कोणत्याचा ठोस उपाय राबविला जात नसल्याने याचा नाहक त्रास वाहन चालकांना सहन करावा लागत आहे.

मुळात या परिसरात पार्किंग झोन नसतानाही दहा चाकी व सहा चाकी ट्रक कसेही उभे केलेले असतात; मात्र पालिका प्रशासन व पोलिस प्रशासन याकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप नागरिक तसेच वाहच चालकातून होत आहे. दुसरीकडे शहरात नो पार्किगमध्ये वाहन उभे केल्यास त्याला वाहतूक पोलिसांकडून दंड आकारला जातो; मात्र याठिकाणी पार्किग नसतानाही पोलिस यांच्यावर कारवाई का करत नाहीत, असा प्रश्‍न उपस्थित केला जात आहे.