विनयभंग प्रकरणी 48 तासांत आरोपीला शिक्षा

विनयभंग प्रकरणी 48 तासांत आरोपीला शिक्षा

रत्नागिरी - येथील न्यायालयाने 48  तासाच्या आत विनयभंग प्रकरणी आरोपीला एक वर्षांचा सश्रम कारावास आणि तीनशे रूपयेे दंडाची शिक्षा ठोठावली आहे.

रत्नागिरी तालुक्यातील ओरी गावात एका महिलेच्या घरात घसून गणेश अनंत घवाळी याने विनयभंग केला होता. पीडित महिलेने याबाबत २२ सप्टेंबर रोजी ग्रामीण पोलीस स्टेशनला तक्रार दाखल केली. पोलिसांनी या प्रकरणी तातडीने कारवाई करत आरोपी गणेश घवाळीला अटक केले. विशेष म्हणजे २४ सप्टेंबरला आरोपी विरोधात ग्रामीण पोलिसांनी न्यायालयात दोषारोपपत्र देखील दाखल केले व हा खटला जलद न्यायालयात चालवावा अशी विनंती केली.

न्यायालयाने देखील त्यांची विनंती मान्य करत तातडीने सुनावणी सुरू केली. साक्षी पुरावे तपासण्यात आले व न्यायलयाने आरोपी गणेश घवाळीला १ वर्षांचा सश्रम कारावास आणि तीनशे रूपयांचा दंड ठोठावला. जलद गतीने एखाद्या महिलेला न्याय मिळण्याची बहुदा जिल्ह्यातील पहिलीच घटना असावी.  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com