लोटेतील सांडपाणी प्रकल्प 18 महिन्यांत पूर्ण

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 1 ऑगस्ट 2016

गुहागर : लोटे येथील रासायनिक सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पाच्या विस्ताराचे काम 18 महिन्यांत पूर्ण होईल, तसेच या प्रकल्पातील पाणी समुद्रात तीन किलोमीटर आत सोडण्यासाठी 14 कोटी रुपये राज्य शासन खर्च करेल, असे आश्‍वासन पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी आज अधिवेशनात दिले. गुहागरचे आमदार भास्कर जाधव यांनी रासायनिक सांडपाणी प्रकल्प आणि खाडी प्रदूषणाबाबत विधानसभेत लक्षवेधी प्रश्‍न उपस्थित केला होता. 

अधिवेशनात गुहागरचे आमदार भास्कर जाधव यांनी लोटे येथील रासायनिक सांडपाणी प्रकल्पाचा विस्ताराबरोबरच दूषित पाण्यामुळे मोठ्या प्रमाणात मासे मृत होऊन मच्छीमारांचे नुकसान होत असल्याने शासन मदत करणार का, असा प्रश्‍न लक्षवेधी तासिकेत विचारला होता. प्रदूषण नियंत्रण मंडळाचे उपप्रादेशिक अधिकारी कार्यालय कोल्हापूरला असल्याने येथे प्रदूषणाबाबत घडणाऱ्या घटना बऱ्याचवेळा कोल्हापूरपर्यंत पोचत नाहीत. त्यामुळे चिपळूणमध्ये शासन कायमस्वरूपी अधिकारी नियुक्त करणार का, असाही प्रश्‍न विचारला होता. 

या प्रश्‍नांना उत्तर देताना पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी लक्षवेधीमधून आमदार भास्कर जाधव यांनी मांडलेले प्रश्‍न वस्तुस्थिती दर्शविणारे असल्याचे मान्य केले. त्यांनी सांगितले, की दूषित पाण्यामुळे मासे मरून होणाऱ्या नुकसानाच्या भरपाईबद्दल उद्योजकांबरोबर चर्चा करून निर्णय घेण्यात येईल. रत्नागिरीसाठी प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या उपप्रादेशिक अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्याबाबत शासन निश्‍चित विचार करेल. रासायनिक सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पाच्या विस्ताराच्या कामाला ठेकेदाराकडून उशीर होत आहे. त्याची चौकशी करण्यात येईल.

सांडपाणी तीन किलोमीटर आत सोडणार
श्री. कदम यांनी म्हटले आहे, की लोटो सांडपाणी प्रकल्पाच्या विस्ताराचे काम 18 महिन्यांत पूर्ण होईल. या प्रकल्पातील पाणी समुद्रात तीन किलोमीटर आत सोडण्यासाठी 14 कोटी रुपये राज्य शासन खर्च करेल, असेही आश्‍वासन त्यांनी सभागृहात दिले. 

कोकण

महाड - पोलादपूर तालुक्यातील कापडे येथील श्रीवरदायिनी माध्यामिक विद्यालयाच्या प्रांगणात प्रार्थना सुरु असताना अचानक झाड कोसळल्याने...

03.42 PM

‘आपत्ती’ यंत्रणा सज्ज - दरडी कोसळल्‍याने चिपळूण-कराड मार्ग ११ तास ठप्प   चिपळूण - मुंबई-गोवा महामार्गावरील परशुराम आणि...

12.21 PM

पेट्रोलचे दररोजचे बदलते दर - आज दिल्लीत चर्चा   रत्नागिरी - दररोज बदलणारे पेट्रोलचे दर ही फक्त ग्राहकांनाच नव्हे, तर...

12.21 PM