स्वच्छता अॅपवरील तक्रारींची दोन तासात दखल घेऊ - साळगावकर

स्वच्छता अॅपवरील तक्रारींची दोन तासात दखल घेऊ - साळगावकर

सावंतवाडी - स्वच्छता अॅपचा आधार घेवून दोन तासाच्या आत शहरातील तक्रारीची दखल घेणार असल्याची माहिती नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी दिली.

स्वच्छता मोहीमेसाठी आयोजित बैठकीत आज त्यांनी ही माहीती दिली. या पार्श्वभुमीवर जनजागृतीसाठी खास अॅम्बेसिडर नेमला जाईल. शंभर मीटरवर कचरा कुंडी  ठेवण्यात येईल, रात्रीच्यावेळी साफसफाई केली जाईल, असेही नगराध्यक्ष साळगावकर यांनी सांगितले. आजी-माजी नगरसेवक तसेच नागरिकांच्या विशेष बैठकीत हा निर्णय त्यांनी जाहीर केला.

प्लास्टिकमुक्तीमुळे व्यापाऱ्यांमध्ये नाराजी पसरली आहे. पण 95 टक्के शहर प्लास्टिकमुक्त झाले असल्याचा दावाही यावेळी श्री साळगावकर यांनी व्यक्त केला. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com