‘बा-बापू’ १५० यात्रा सावंतवाडीतून निघणार - कुमार मनी

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 1 ऑक्टोबर 2017

सावंतवाडी - राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि कस्तुरबा गांधी यांच्या जीवनाला २०१९ मध्ये १५० वर्ष पूर्ण होत आहे. यानिमित्त २ ऑक्‍टोबरला सावंतवाडी ते साबरमती अशी ‘बा-बापू’ १५० यात्रा आयोजित केली आहे. देशात विस्कळीत झालेला गांधी विचारसरणीचा वर्ग संघटित व्हावा, यासाठी देशात पाच ठिकाणी यात्रा आयोजित करण्यात आल्या आहेत. यातील दुसरी यात्रा शहरातील गांधी चौक येथून निघणार आहे, अशी माहिती यात्रेचे समन्वयक कुमार कलानंद मनी यांनी येथे दिली. येथील पत्रकार कक्षात आयोजित पत्रकार परिषदेत कलानंद यांनी ही माहिती दिली. यावेळी हरिहर वाटवे उपस्थित होते. 

मनी म्हणाले, ‘‘महात्मा गांधीजींनी अहिंसेच्या मार्गने देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले. यांच्या विचारांचे असंख्य कार्यकर्ते आज देश विदेशात आहेत. गांधीजीनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी अनेक चळवळी केल्या. यात त्यांना त्यांच्या पत्नी कस्तुरबा गांधी यांनी साथ दिली. त्यांना ‘बा’ म्हणून ओळखले जायचे. महात्मा गांधीजी आणि त्याच्या पत्नीचे जन्मसाल एकच आहे. त्यांच्या जन्माला २०१९ मध्ये १५० वर्ष होतील. त्यानिमित्ताने देशातील गांधी विचारांच्या चार संघटनांनी एकत्र येऊन ‘बा- बाबू’ १५० वर्ष साजरी करण्याचे ठरवले आहे.’’

यात गुजरात येथील संवेदन ट्रस्ट, गोव्यातील पेसफुल सोसायटी, कोची येथील जन आरोग्य प्रस्थान आणि दिल्ली येथील गांधी युवा बिरादरी या संघटनांचा समावेश आहे. या उत्सवात गांधी विचारांवर आधारित अनेक उपक्रम आयोजित करण्यात आल्याचे मनी यांनी सांगितले.

ते पुढे म्हणाले, ‘‘सावंतवाडी येथून निघणाऱ्या यात्रेचा प्रारंभ २ ऑक्‍टोबरला सकाळी ८ वाजता नगराध्यक्ष बबन साळगावकर यांच्या हस्ते गांधी चौक येथे होईल. शहरातील या यात्रेत ८ ते १० जण सहभागी होईल. यानंतर ही यात्रा चिपळूण, महाबळेश्वर, नाशिक, तपी, बरडोली येथून सुरत, वडोदरा, मटर, खेडा, वमंगम अशी साबरमती आश्रम पर्यत जाणार आहे. या यात्रेत गांधी विचार चळवळीतील जेष्ठ कार्यकर्ते रमेश शर्मा, अनिल फरसोले, महेंद्र मोहन, वैशाली पाटील आदी सहभागी होणार आहेत. या यात्रेत ‘बा- बाबू’ यांच्या कार्याची माहिती दिली जाणार आहे.