अश्‍लील चित्रफीत काढणाऱ्यावर गुन्हा

अश्‍लील चित्रफीत काढणाऱ्यावर गुन्हा

सावंतवाडी - महिलेची अश्‍लील चित्रफीत तयार केल्याप्रकरणी येथील पोलिसांनी कारिवडेतील तरुणावर गुन्हा दाखल केला. सायंकाळी त्याला ताब्यात घेण्यात आले आहे. गोपीचंद शांताराम सावंत (वय ३५) असे त्याचे नाव आहे.

घरात कोणीही नसल्याची संधी साधून गोपीचंद हा संबंधित महिलेच्या घरात घुसला. पतीला व मुलाला जीवे मारण्याची धमकी देत जबरदस्तीने क्‍लीप काढल्याचे त्या महिलेने तक्रारीत म्हटले आहे. ही माहिती पोलिस निरीक्षक सुनील धनावडे यांनी दिली. तालुक्‍यातील एका गावातील महिलेची अश्‍लील क्‍लीप व्हॉट्‌स ॲपवर व्हायरल झाली होती. हा प्रकार त्या महिलेच्या पतीला अज्ञात व्यक्तीने कळविला होता.

याप्रकरणी खात्री केल्यानंतर संबंधितांनी पोलिस ठाण्यात धाव घेतली. याप्रकरणी आपल्याला पूर्ण माहिती नसल्यामुळे आपण माहिती घेऊन तक्रार देऊ, असे पीडित महिलेच्या पतीने सांगितले होते. आज याप्रकरणी त्याने तक्रार दाखल केली. महिलेने दिलेल्या तक्रारीत आपल्या ओळखीचा असलेल्या गोपीचंद याने पती व मुलाला ठार मारण्याची धमकी देऊन अश्‍लील क्‍लीप काढली. हा प्रकार १३ व १४ सप्टेंबरला घडला. त्या वेळी आपल्या घरात कोणीच नसल्याची संधी साधून त्याने हा प्रकार केला होता, अशी तक्रार दिली.

या प्रकाराबाबत तक्रार देण्यासाठी १५ नोव्हेंबरला पोलिस ठाण्यात गेलो असता गोपीचंद याने आपल्या पतीच्या मोबाईलवर फोन करून माझ्याविरोधात तक्रार केल्यास तुलासुद्धा ठार मारेन, अशी धमकी दिल्याचे तक्रारीत म्हटले आहे. 

संबंधित पीडित महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार विनयभंगासह लैंगिक छळवणूक करणे, विवस्त्र करून अश्‍लील फोटो काढणे आणि ते सोशल मीडियावर प्रसिद्ध केल्याप्रकरणी गोपीचंद याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती धनावडे यांनी दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com