ब्लॅकमेल करून विवाहितेवर अत्याचार

ब्लॅकमेल करून विवाहितेवर अत्याचार

बांदा - धमकी देत विवाहितेवर तिघा तरुणांनी वारंवार अत्याचार केल्याचा प्रकार उघड झाला. याबाबत पीडित महिलेने येथील पोलिस ठाण्यात  फिर्याद दिली. या प्रकरणारतील संशयित तिघांपैकी निखिल ऊर्फ मोहन शंकर आरोसकर (वय 22) व साईनाथ बाबा धुरी (32, दोन्ही रा. शेटकरवाडी) या दोघांना पोलिसांनी मंगळवारी सायंकाळी उशिरा अटक केली. तिसरा संशयित गौरेश केरकर पोलिसांना सापडला नाही. 

याबाबत येथील पोलिस निरीक्षक जयदीप कळेकर यांनी दिलेली माहिती अशी - संबंधित महिलेचा विवाह 2016 मध्ये झाला होता. यानंतर तिच्या पतीचा मित्र असलेला निखिल जानेवारीत पीडित महिलेच्या घरी पाणी मागण्यासाठी गेला होता. ती महिला पाणी आणण्यासाठी किचनमध्ये गेली असता निखिलने तिच्या मोबाईलवरून तिचा नंबर घेतला. त्यावरून त्याने तिला धमकी दिली. शारीरिक संबंध करू न दिल्यास तुला व तुझ्या पतीला ठार मारू, अशा धमक्‍या देत त्याने तिच्यावर अतिप्रसंग केला. धमकीमुळे घाबरलेल्या विवाहितेने ही गोष्ट आपल्या पतीला सांगितली नाही. 

दरम्यान, निखिलने याबाबत आपले मित्र साईनाथ व गौरेश यांना सांगत त्या महिलेचा नंबर दिला. त्यांनीही तिच्या घरी जाऊन तुझ्या आणि निखिल यांच्यातील संबंधाची माहिती तुझ्या पतीला सांगू, अशी धमकी देत तिच्यावर अतिप्रसंग केला. काही दिवसांपूर्वी ती विवाहिता आपल्या माहेरी गेली असता निखिलने तिला फोनवरून धमकी देत बोलवून घेत पुन्हा अतिप्रसंग केला; मात्र आपल्या पतीला व आपल्या जीवाला धोका होईल, या भीतीने तिने ही गोष्ट सांगितली नाही. 

हा प्रकार जानेवारी ते ऑगस्ट या कालावधीत घडला. वारंवार होणाऱ्या या त्रासामुळे ती विवाहिता मानसिक दबावाखाली वावरत होती. अखेर मानसिक त्रासाला कंटाळून तिने आज या तिघांविरोधात अत्याचाराची फिर्याद दिली. येथील पोलिस ठाण्यात तक्रार देण्यासाठी आलेली ही महिला प्रचंड दबावाखाली असल्याचे दिसून येत होते. येथील पोलिसांनी तिला धीर देत तिची तक्रार घेतली.

या प्रकरणातील तिघांपैकी दोघांना तत्काळ अटक केली. यातील तिसरा संशयित गौरेश कामाला बाहेर गेल्याने पोलिसांना आढळून आला नाही. तिघे संशयित संबंधित महिलेच्या पतीचे मित्र असल्याचे निष्पन्न झाले.तिसऱ्या संशयित गौरेश याला उद्या (ता. 27) ताब्यात घेतले जाईल, अशी माहितीही त्यांनी दिली. 

दबाव आणण्याचा प्रयत्न 
संबंधित महिलेने तक्रार देऊ नये, यासाठी तिच्यासह तिच्या पतीवर दबाव आणला जात होता. मात्र त्या महिलेचे वकीलपत्र घेतलेल्या वकील युवतीने तक्रार कोणत्याही परिस्थितीत मागे घेणार नसल्याचे सांगत हा दबाव झुगारून लावला. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com