पंचायत समिती सभापती अन्‌ हाडाचा शेतकरीही

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 26 ऑक्टोबर 2017

सावंतवाडी -  कोकणी माणूस आणि शेती असे काहीसे नाते आहे; मात्र आजच्या धकाधकीच्या जीवनात यश मिळविण्यासाठी ह्या नात्यापासून सर्वसामान्य माणूस कोठे तरी लांब होत आहे. त्यात व्हाईट कॉलर जॉबचा बोलबोला असल्यामुळे एकदा यशस्वी झालेला माणूस पुन्हा मागे वळून हात नाही; मात्र येथील पंचायत समितीचे सभापती रवी मडगावकर या सर्व गोष्टींना अपवाद आहेत.

दीर्घकाळ स्थानिक स्वराज्य संस्थेचे प्रतिनिधित्व करत असताना व आता सभापतीपदी विराजमान असूनही शेतात राबणे त्यांनी थांबविलेले नाही. त्यांच्यातील हा हाडाचा शेतकरी सोशल मीडियावर झळकलेल्या एका छायाचित्रामुळे ठळकपणे नजरेस आला. त्यांचा भाताचे पेंडुक घेतलेला फोटो आज सोशल मीडियावर फिरताना दिसत होता. त्यामुळे हा सर्वसामान्य माणूस तालुक्‍याचा सभापती आहे हे सावंतवाडीसारख्या शेतीप्रधान भागासाठी भूषणावह असल्याच्या प्रतिक्रिया सोशल मीडियावर झळकल्या.

मडगावकर हे मुळचे गोवा-मडगाव बोरी येथील. सुवर्णकार हा त्यांचा पिढीजात धंदा. त्यांच्या सातहून अधिक पिढ्यापुर्वी ते सांगेली-सावरवाड येथे येवून स्थायिक झाले. वडील शेतीत रमले नाहीत. त्यांनी शिक्षकी पेशा पत्करला. या काळात ते सेवानिवृत्त झाल्यानंतर त्यांनी राजकारणात यावे अशी इच्छा गावकऱ्यांनी व्यक्त केली. परंतू त्यांच्या तब्येतीमुळे त्यांनी तो प्रस्ताव नाकारला आणि आपल्या मुलाला संधी देण्याची विनंती केली. त्यामुळे मडगावकर हे राजकारणात आहेत. राजकारणात त्यांनी कधी मागे वळून पाहिले नाही. आज ते स्वत: पंचायत समिती सभापती तर पत्नी सुप्रिया नुकत्याच झालेल्या निवडणुकीत ग्रामपंचायत सदस्य म्हणून निवडून आल्या आहेत.

मडगावकर हे पिढीजात सुवर्णकार असले तरी त्याची शेती मोठी आहे. राजकारण आणि व्यवसाय सांभाळून ते आज तब्बल दोन ते तीन एकर क्षेत्रात शेती करीत आहेत. त्यात आपल्याला घरातील व्यक्ती सहकार्य करतात असे ते सांगतात. आता बैल, म्हैशी अशी जनावरे राहिली नाहीत; मात्र पॉवर टिलरच्या सहाय्याने आपण शेती करतो आणि आमच्या कुटुंबाला लागेल ते पिकवतो. त्यासाठी स्वत: घाम गाळून शेती करण्यास काय लाज असे ते अभिमानाने सांगतात.