सिंधुदुर्ग जिल्ह्यात उमेदवारांची संख्या राज्यात सर्वाधिक - सहारीया

सिंधुदुर्ग जिल्ह्यात उमेदवारांची संख्या राज्यात सर्वाधिक - सहारीया

कुडाळ - सिंधुदुर्गात 325 ग्रामपंचायतीच्या निवडणुकीमध्ये सरपंचपदासाठी 791 तर सदस्यपदासाठी 1735 उमेदवार रिंगणात आहेत. एकूण 2526 उमेदवार निवडणूक लढवित आहेत. 46 सरपंच तर 926 सदस्य बिनविरोध झाले. राज्याशी तुलना करता जिल्ह्यात इच्छुकांची संख्या सर्वाधिक आहे. गुन्हेगार प्रवृत्तीला आळा बसण्यासाठी जिल्ह्यात 20 ठिकाणी नाका तपासणी होणार आहे. प्रचार यंत्रणा 14 ऑक्‍टोबरला सायंकाळी साडेपाचपर्यंत असणार आहे, अशी माहिती राज्य निवडणूक आयोगाचे आयुक्त जे. एस. सहारीया यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. 

या वेळी राज्य निवडणूक सचिव शेखर चन्ने, जिल्हाधिकारी उदय चौधरी, पोलिस अधीक्षक दीक्षितकुमार गेडाम, जिल्हा माहिती अधिकारी मिलिंद बांदिवडेकर उपस्थित होते. श्री. सहारीया म्हणाले, ""राज्यात ग्रामपंचायत निवडणूक पार्श्‍वभूमीवर सिंधुदुर्गची माहिती घेतली. 22 ते 29 सप्टेंबर या कालावधीत 6500 नामनिर्देशनपत्र दाखल करण्यात आली. आठ तालुक्‍यातील एकूण 425 ग्रामपंचायतीपैकी 325 ग्रामपंचायतीच्या निवडणूका होत आहेत.`` 

5 ऑक्‍टोबरला छाननीच्यावेळी 837 सरपंच व 3525 सदस्य पदासाठीचे उमेदवार रिंगणात होते. राज्यात सर्वात जास्त इच्छुक उमेदवार संख्या सिंधुदुर्गातील ग्रामपंचायतीमध्ये दिसून आली. 325 सरपंचपदामध्ये 46 बिनविरोध झाल्याने 791 उमेदवार रिंगणात आहेत. सदस्यांमध्ये 926 बिनविरोध झाल्याने 1735 उमेदवार रिंगणात आहेत. जिल्ह्यात 4 लाख 2 हजार मतदार आहेत., असेही सहारीया यांनी सांगितले.

निवडणूक शांततेत पारदर्शकपणे पार पडाव्यात, यासाठी पोलिस अधिकारी तैनात ठेवण्यात आले आहेत. निवडणुका चांगल्या पद्धतीने व्हाव्यात, आचारसंहितेचे पालन व्हावे, कोणताही गैरप्रकार घडू नये यासाठी पोलिस यंत्रणेकडून उपाययोजना करण्यात आली आहे. गुन्हेगारी प्रवृत्तीला आळा घालण्यासाठी 20 ठिकाणी नाका तपासणी होणार आहे. या ठिकाणी सीसीटिव्ही कॅमेरे असणार आहेत. शिवाय आवश्‍यकतेनुसार भरारी पथके असणार आहेत. 43 पोलिस सेक्‍टरमध्ये पोलिस अधिकारी असतील. 22 सप्टेंबरपासून आतापर्यंत 101 गुन्हे नोंदविण्यात आले. यामध्ये 45 लाखांची दारू जप्त करण्यात आली. अवैध हत्त्यारे, शस्त्रे जमा करण्याची सुरवात झाली आहे. हवाई, रेल्वे, समुद्र, रस्ते या ठिकाणावर गैरप्रकार घडू नये, यासाठी आमची नजर असणार आहे. मतमोजणी 17 ऑक्‍टोबरला तालुक्‍याच्या ठिकाणी होणार आहे 

जाहीर प्रचार शनिवारी सायंकाळपर्यंत 
उमेदवारांना प्रचार यंत्रणा राबविण्याची वेळ 14 ऑक्‍टोबर सायंकाळी साडेपाचपर्यंत असणार आहे, असे श्री. सहारीया यांनी सांगितले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com