सिंधुदुर्गात दुसऱ्या टप्प्यात ग्रामपंचायत निवडणूकीत समर्थचेच वर्चस्व

सिंधुदुर्गात दुसऱ्या टप्प्यात ग्रामपंचायत निवडणूकीत समर्थचेच वर्चस्व

सावंतवाडी - ग्रामपंचायत निवडणुकीच्या दुसर्‍या टप्प्यात महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाच्या समर्थ विकास पॅनलने वर्चस्व कायम राखले आहे. त्यांच्याकडे 84 ग्रामपंचायती आल्या आहेत.

जिल्ह्यातील आठही तालुक्यात मतमोजणीच्या दुसर्‍या टप्प्यात 174 ग्रामपंचायतीचे निकाल जाहीर झाले. यात 84 ठिकाणी समर्थविकास, शिवसेनेकडे 39, भाजपकडे 27, युतीकडे 1 तर गावपॅनलने 21 तर राष्ट्रवादी व मनसेने प्रत्येकी 1 ग्रामपंचायत मिळविली. सावंतवाडी, मालवण, कणकवली, देवगड आणि वैभववाडीत समर्थ विकास तर दोडामार्गमध्ये शिवसेनेने सर्वाधिक जागा मिळविल्या. वेंगुर्ले येथील निकाल उशिरापर्यंत मिळाले नव्हते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com