न्याय न मिळाल्यास प्रकल्पग्रस्त रस्त्यावर उतरणार

कणकवली : येथील गांगो मंदिरामध्ये शहरातील प्रकल्पग्रस्तांची  बैठक झाली.
कणकवली : येथील गांगो मंदिरामध्ये शहरातील प्रकल्पग्रस्तांची बैठक झाली.

कणकवली - केंद्रीय वाहतूकमंत्री नितीन गडकरी प्रकल्पग्रस्तांना हवा तेवढा मोबदला देणार असल्याचे सांगतात. पण प्रशासकीय यंत्रणा मात्र पूर्वी केलेल्या मूल्यांकनावर ठाम आहे. याप्रश्‍नी २७ नोव्हेंबरला होणाऱ्या बैठकीत तोडगा न निघाल्यास रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला.

येथील गांगोमंदिरामध्ये शहरातील प्रकल्पग्रस्तांची बैठक झाली. यात उपनगराध्यक्ष कन्हैया पारकर, नगरसेवक समीर नलावडे, बंडू हर्णे, किशोर राणे, व्यापारी उदय वरवडेकर, बाळा बांदेकर, अशोक करंबेळकर, सचिन म्हाडगुत, शिशिर परुळेकर आदी उपस्थित होते.

शहरातील प्रकल्पग्रस्तांनी विविध राजकीय पक्षाच्या प्रतिनिधींसमवेत भूसंपादन सचिव, राज्याचे महसूल मंत्री तसेच केंद्रीय वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांचीही भेट घेतली आहे. या सर्वांच्या एकत्रित प्रयत्नातून २७ नोव्हेंबरला जिल्हाधिकारी कार्यालयात राष्ट्रीय महामार्ग विभागाचे मुख्य अभियंता देशपांडे यांच्या समवेत बैठक होणार आहे. मागण्यांबाबत कार्यवाही न झाल्यास पुन्हा एकदा बैठक घेऊन रस्त्यावर उतरून व्यापक आंदोलन करण्याचे शहरातील व्यापारी आणि लोकप्रतिनिधीनी 
निश्‍चित केले.

प्रत्येक प्रकल्पग्रस्तांनी ठोस पुराव्यासह जिल्हाधिकाऱ्यांकडे वैयक्‍तिक हरकत नोंदवावी. यात इमारत, गाळे आणि इतर मालमत्तांचे बाजारमूल्यानुसार झालेले नुकसान आणि भविष्यकाळातील व्यावसायिक नुकसान किती होईल त्याचीही परिपूर्ण माहिती द्यावी, असे आवाहन बंडू हर्णे यांनी केले. चौपदरीकरणाचे काम सरकार विरोध डावलून करणार आहे. त्यामुळे आत्ताच सर्वांनी एकत्र येऊन मोबदल्याबाबत आवाज उठवूया. त्यासाठी प्रत्येकाने रस्त्यावर उतरून संघर्ष करूया, असे आवाहन उपनगराध्यक्ष कन्हैया पारकर, नगरसेवक समीर नलावडे यांनी केले.

दरम्यान, निवाड्याबाबत हरकती नोंदविण्यासाठी २० दिवसांचा कालावधी शिल्लक आहे. त्यामुळे भरपाई मिळण्याबाबतचे आपले हक्‍क शाबीत ठेवून प्रकल्पग्रस्तांनी वैयक्तिकरीत्या लवादाकडे दाद मागायची दुसरीकडे सर्वांनी एकत्र येत रस्त्यावर लढा द्यायचा असे निश्‍चित करण्यात आले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com