कोकणात मेडिकल टुरिझममधून परदेशी चलन - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

तुषार सावंत
रविवार, 27 मे 2018

कणकवली - खासदार नारायण राणेंच्या स्वप्नातील कोकणातील पहील्या मेडीकल कॉलेजला परवानगी लवकरच मिळेल, असा विश्‍वास राज्याचे मुख्यमंत्री देवद्र फडणवीस यांनी पडवे (ता. कुडाळ) येथे लाईफ टाईम रुग्णालय उद्घाटन प्रसंगी  बोलताना केले. मेडीकल टूरिझमची संकल्पना येथे सुरू होत असल्याने परदेशी चलनामुळे अर्थव्यवस्थेलाही त्याचा लाभ होईल, असेही ते म्हणाले.

कणकवली - खासदार नारायण राणेंच्या स्वप्नातील कोकणातील पहील्या मेडीकल कॉलेजला परवानगी लवकरच मिळेल, असा विश्‍वास राज्याचे मुख्यमंत्री देवद्र फडणवीस यांनी पडवे (ता. कुडाळ) येथे लाईफ टाईम रुग्णालय उद्घाटन प्रसंगी  बोलताना केले. मेडीकल टूरिझमची संकल्पना येथे सुरू होत असल्याने परदेशी चलनामुळे अर्थव्यवस्थेलाही त्याचा लाभ होईल, असेही ते म्हणाले.

सिंधुदुर्ग शिक्षण प्रसारक मंडळ संचलीत लाईफ टाईम रूग्णालयाचे उद्घाटन रविवारी मुख्यमंत्र्याच्या हस्ते झाले.

ज्या कोकणातील जनतेने आपणाला मोठे केले त्याची उतराई होण्यासाठी दुरदृष्टी ठेवून खासदार नारायण राणे यांनी आंतरराष्ट्रीय दर्जाचे सुपर स्पेशालीस्ट हॉस्पिटल उभारले आहे. त्यातील सेवा ही तशी दर्जेदार असेल.

- देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, महसुलमंत्री चंद्रकांत पाटील, शिक्षणमंत्री विनोद तावडे, जलसंधारण मंत्री राम शिंदे, आमदार नितेश राणे, गोवा राज्याचे मंत्री पांडुरंग साळगावकर, रमाकांत खलप, कृपाशंकर सिंह आदी उपस्थित होते. 

श्री. फडणवीस म्हणाले, रोगराई आणि प्रदुषण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. मात्र येथील निसर्गाच्या सानिध्यात रूग्ण अर्धा अधिक बरा होईल. सिंधुदुर्ग जिल्हा हा राज्यातला पहीला पर्यटन जिल्हा येथे जगभरातील पर्यटक येत आहे. आज जगभरामध्ये मेडीकल टूरीझम राबवला जात आहे. येथेही ती सुविधा असल्याने देशातले नव्हे तर जगभरातील पर्यटक उपचारासाठी येथील, अमेरीकेत एका रूग्णासाठी 50 लाख खर्च येतो येथे परदेशी रूग्णाला केवळ 10 लाखात हे उपचार मिळणार आहेत. हे रूग्णालय सर्वसामान्य जनेतेसाठी आहे. त्यामुळे राज्यसरकारच्या वैद्यकीय सेवेतील विविध योजना या रूग्णालयात मिळतील. महात्मा फुले आरोग्य योजना, मुख्यमंत्री सहायता निधीतून होणारी आरोग्यसाठीची 5 लाखापर्यतची मदत देण्यासाठी पुढच्या काळात आपण प्रयत्नशील राहू, असेही त्यांनी सांगितले. 

श्री. पवार यांनीही राणेंच्या भव्यदिव्य रूग्णालयाची स्तूती केली. या जिल्ह्यातील जनतेचा स्वभाव फार स्पष्ट आहे. राणेंनी आपल्या कर्तत्वाचा ठसा विधानसभेत उमठवला. 

कोकणच्या दृष्टीने सोन्याचा दिवस- पवार 
कोकणातील जनतेला उपचारासाठी जिल्ह्याबाहेर जावे लागत होते. ही उणीव राणेंनी दुर केली. त्यामुळे आजचा दिवस हा कोकणीजनेतेच्या दृष्टीने सोन्याचा दिवस आहे. या जिल्ह्यासाठी जी फलोद्यान योजना यापुर्वी होती. ती कायम सुरू ठेवावी, अशी सुचना शरद पवार यांनी मुख्यमंत्र्याना केली. या भागाचा शेती, बागायतीतून बदल होतो आहे. इथला तरूण आता मुंबईत जात नाही. 

Web Title: Sindhudurg News inauguration of Specialty hospital in Padave