सिंधुदुर्ग-कणकवली रेल्वे मार्गावर माती कोसळल्याने रेल्वे वाहतूक दोन तास ठप्प

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 14 जुलै 2017

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कसाल येथे रेल्वे रूळावर माती कोसळल्याने सिंधुदुर्ग-कणकवली रेल्वे मार्गावरून जाणाऱ्या रेल्वेगाड्यांची वाहतूक आज दोन तास ठप्प झाली होती.

सिंधुदुर्ग - सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कसाल येथे रेल्वे रूळावर माती कोसळल्याने सिंधुदुर्ग-कणकवली रेल्वे मार्गावरून जाणाऱ्या रेल्वेगाड्यांची वाहतूक आज दोन तास ठप्प झाली होती.

आज दुपारी साडे बाराच्या सुमारास सिंधुदुर्ग-कणकवली रेल्वे मार्गावर माती कोसळली. त्यामुळे या मार्गावरील रेल्वे वाहतूक ठप्प झाली. बिकानेर-कोइम्बतूर रेल्वे कणकवली स्थानकात एक तास उभी होती. त्यानंतर माती हटविण्याचे काम युद्धपातळीकर करण्यात आले आणि अखेर दुपारी अडीचच्या सुमारास संपूर्ण माती हटवून रेल्वे वाहतूक पूर्ववत करण्यात आली, अशी माहिती ओरोस स्टेशन मास्टर रोहिणी सावंत यांनी दिली.