कोकमचे उत्पादन सिंधुदुर्गात 40 टक्‍क्‍याने घटले

कोकमचे उत्पादन सिंधुदुर्गात 40 टक्‍क्‍याने घटले

सावंतवाडी - यंदाच्या बदलत्या हवामानाचा फटका जिल्ह्यातील कोकमला बसल्याने जीआय मानांकनाच्या यादीतील कोकमचे उत्पादन 40 टक्‍क्‍याने घटले आहे. कोकम लागवडीच्या एकूण 60 टक्के कोकम हाती लागत असण्याची स्थिती असतानाही आता केवळ 20 टक्केच कोकम हाती लागण्याची शक्‍यता आहे. याचा सर्वात जास्त फटका प्रक्रिया उद्योगांना बसण्याची शक्‍यता आहे.

देशात जिल्ह्यात सर्वात जास्त कोकम लागवडीखाली क्षेत्र आहे. अशात केरळचा काही अशी भाग कर्नाटक, गोव्यानंतर कोकणात असे मिळून 93 टक्के भागात कोकमचे क्षेत्र आहे. यावर्षीचा वातावरणाच्या बदलाचा आंबा, काजूवर प्रतिकूल परिणाम झाला. यासोबत जीआय मानांकन मिळविलेला कोकमही यंदा पुर्णपणे धोक्‍याच्या गर्तेत सापडला. याचा थेट परिणाम आता उत्पादन व प्रक्रिया उद्योगावर होणार आहे.

सिंधुदुर्गातील बराचसा भाग कोकमने व्यापलेला आहे. कोकमला जी. आय. मानांकन प्राप्त झाले आहे. याचा विचार करुन त्याचे पीक वाचविण्यासाठी शासनाकडून प्रयत्न होणे आवश्‍यक आहे. यंदाचे पिकही पावसाच्या आहारी गेल्यामुळे घटले आहे.
- डॉ. आनंद तेंडूलकर,
कोकम अभ्यासक

एकुण 13 हजार मेट्रीक टन उत्पादन भारतात होते. त्यापैकी 93 टक्के कोकम हे कर्नाटक, गोवा, महाराष्ट्रातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात होते. देशातल्या 93 टक्‍क्‍यापैकी 80 टक्केच्या आसपास उत्पादन हे एकट्या सिंधुदुर्गात होते. कृषी विभागाच्या अहवालानुसार सिंधुदुर्गात 15 हजार 98 एवढे क्षेत्र हे कोकम लागवडीखाली येत असल्याचा अहवाल काढण्यात आला आहे. तर हा अहवालात काही अंशी क्षेत्र गृहीत नसल्याचेही सांगण्यात येत आहे.

कोकमची व्यापारी तत्वावर मोठी लागवड होताना दिसून येत नाही. यावर्षीच्या हवामानाच्या माऱ्यामुळे बरेचसे कोकम नुकसानीच्या तोडात गेले. फळप्रक्रिया उद्योगापुढे मोठे संकट निर्माण झाले आहे.
- बाळासाहेब परुळेकर,
अध्यक्ष, सिंधुदुर्ग डिस्ट्रीक ऑरगॅनिक फार्मर फेडरेशन.

खासगी, जंगल परिसरातील, परंपरागत क्षेत्राचा विचार करता या एकुण सर्व क्षेत्रातून कोकमचे 8 हजार 500 मेट्रीक टन उत्पादन होत असल्याचा निष्कर्ष कृषी तज्ञाचा आहे. अवकाळी पावसाचा काजु, आंब्यासोबतच सर्वात मोठा मारक परिणाम हा कोकमसारख्या पिकांवर होतो. यंदा दोन ते तीन वेळा अवकाळी पाऊस व दमट हवामानाचा बदल निर्माण झाला होता.

दरवर्षीच्या हवामानाचा अंदाज घेता एकुण उत्पादनाच्या जवळपास 40 टक्के उत्पन्न हाती लागून 60 टक्के कोकमचे फळ हे पावसाच्या तोंडी पडते व वाया जाते. गतवर्षीही कोकम समस्याच्या गर्तेत सापडला होता त्याही पेक्षा यंदा मोठा तोटा होणार आहे. यामुळे प्रक्रिया उद्योगांना निदान पुरेसे तरी कोकम हाती लागणार की नाही याची शाश्‍वती देण्यात येणार आहे. यंदाचा उशिराचा पाऊस, दमट हवामान यामुळे फळगळही झाली. त्यामुळे शेतकऱ्याचे हूकमी उत्पादनही घटले आहे.

कोकम, सोले, औषध निर्मितीसाठी हाती लागलेल्या कोकमचा पुर्ण उपयोग होतो. कोकम ज्युस व इतर फळप्रक्रियेसाठीही प्रक्रिया उद्योगात त्याचा मोठा उपयोग होतो.

पिकांचे संवर्धन करण्याची गरज
कोकमला जीआय मानांकन गेल्याचवर्षी प्राप्त झाले आहे. संशोधकाच्या म्हणण्यानुसार आता जिल्ह्यात दिवसेंदिवस त्याचे क्षेत्र व उत्पादनही घटत आहे. यासाठी या पिकांचे संवर्धन  करण्याची मोठी गरज निर्माण झाली आहे. असे न झाल्यास पुढील 50 वर्षात हे पिक नामशेष होण्याचा धोका आहे. 

प्रकल्प उभारण्यासाठी शासन प्रयत्नशील
कोकमच्या संवर्धनासाठी तसेच त्याच्या उत्पादन प्रक्रियेला गती देण्यासाठी भारत सरकार प्रयत्नशील आहे. देशातील कोकमसाठी 150 कोटीचा प्रकल्प दृष्टीक्षेपात आहे. येत्या 2 ते 3 वर्षात या प्रकल्पाच्या उभारणीला गती मिळणार आहे. सर्वात जास्त क्षेत्र हे सिंधुदुर्गात असल्यामुळे येथील कोकमच्या विकासासाठी या जिल्ह्यावर शासनाची दृष्टी असणार आहे.

 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com