कुणकेश्‍वर यात्रेतील गर्दीवर पोलिसांची ड्रोनद्वारे नजर

संतोष कुळकर्णी 
मंगळवार, 13 फेब्रुवारी 2018

देवगड - कोकणची दक्षिण काशी म्हणून ओळख असलेल्या तालुक्‍यातील श्री क्षेत्र कुणकेश्‍वर यात्रेला आजपासून सुरवात झाली. यात्रेतील भाविकांच्या गर्दीवर पोलीसांनी ड्रोनद्वारे नजर ठेऊन गर्दी नियंत्रित केली जात आहे. उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली पोलीस बंदोबस्त कार्यरत आहे.

देवगड - कोकणची दक्षिण काशी म्हणून ओळख असलेल्या तालुक्‍यातील श्री क्षेत्र कुणकेश्‍वर यात्रेला आजपासून सुरवात झाली. यात्रेतील भाविकांच्या गर्दीवर पोलीसांनी ड्रोनद्वारे नजर ठेऊन गर्दी नियंत्रित केली जात आहे. उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली पोलीस बंदोबस्त कार्यरत आहे.

तालुक्‍यातील ग्रामीण भागातील भाविक यात्रेकरूंच्या सोयीसाठी एसटी प्रशासनाने गावागावातून गाड्यांची सोय केली आहे. मंदिरात दर्शनासाठी सकाळपासूनच गर्दी झाली. दरम्यान, यात्रा परिसरात विविध प्रकारची दुकाने थाटण्यात आली होती. 

पायीवारी भेटीला
फोंडाघाट (ता. कणकवली) येथील श्री गांगोमाऊली मंदिर ते कुणकेश्‍वर अशी पायीवारी आज यात्रेत दाखल झाली. रविवारी (ता.11) सकाळी 6 वाजता पायीवारीला सुरूवात झाली होती. तेथून विठ्ठल मंदिर कोळोशी (ता. कणकवली) व गगनगिरी महाराज आश्रम पाटथर (ता.देवगड) येथे मुक्‍काम करून आज सकाळी पायीवारी कुणकेश्‍वरला दाखल झाली.

इळये सड्याच्या दिशेने यात्रा स्थळावर एसटी, खासगी चारचाकी वाहने, दुचाकी वाहने पार्कींगची स्वतंत्र व्यवस्था केली आहे. तसेच कातवण, मिठबांव आदी मार्गाकडून येणारी वाहने मंदिरापासून काही अंतर जवळ नेता येत होती.

यदां तारामुंबरी -मिठमुंबरी पुल सुरू झाल्याने त्यामार्गे कुणकेश्‍वरला येणारे भाविक असल्याने त्यादृष्टीनेही नियोजन करण्यात आले होते. त्या ठिकाणीही खासगी वाहनांना पार्कींगची सोय ठेवली होती.

एसटी प्रशासनाने तालुक्‍यातील विविध भागातून भाविकांच्या सोयीसाठी एसटीची सोय ठेवली आहे. विविध गावातून आज पहाटेपासूनच गाड्या कुणकेश्‍वर मार्गावर धावत आहेत. येथील आगाराबरोबरच विजयदुर्ग तसेच अन्य आगाराच्या गाड्या यात्रेकरूंची ने- आण करताना दिसत होत्या. खासगी वाहनांचा तळ यात्रेपासून काहीसा दुर आहे. तरीही खासगी वाहने, दुचाकी घेऊन येणाऱ्यांची संख्या मोठी होती. यात्रेत विविध स्टॉल लावण्यात आले आहेत. तसेच विविध खाद्यपदार्थ, शेतीजन्य साहित्य, कलिंगड विक्रेत्यांनी आपली दुकाने थाटली होती. 

असा आहे बंदोबस्त

भाविक यात्रेकरूंची गैरसोय टाळण्यासाठी तसेच त्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टिने उपविभागीय पोलीस अधिकारी दयानंद गवस तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली विविध ठिकाणी पोलीस पथके कार्यरत आहेत. एकूण 8 पोलीस निरीक्षक व सहाय्यक पोलीस निरिक्षक, 13 पोलीस उपनिरिक्षक यांच्यासह 139 पुरूष व 33 महिला पोलिस, वाहतुक शाखेचे 30 पोलीस कार्यरत आहेत. तसेच एकूण सुमारे 120 होमगार्ड तैनात आहेत. यात्रेसाठी कुणकेश्‍वर येथे पोलीसांचा नियंत्रण कक्ष कार्यरत आहे. उंच मनोरे उभारून पोलीस गर्दीवर नियंत्रण ठेवत होते.

Web Title: Sindhudurg News Kunkeshwar Yatra