वेंगुर्लेत फेब्रुवारीमध्ये मराठी साहित्य संमेलन

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 8 नोव्हेंबर 2017

वेंगुर्ले - श्री सातेरी प्रासादिक संघ संचलित, आनंदयात्री वाड्‌मय मंडळातर्फे फेब्रुवारी २०१८ मध्ये तालुकास्तरीय त्रैवार्षिक दुसरे मराठी साहित्य संमेलन होणार आहे. यानिमित्त स्मरणिका काढण्याचे बैठकीत ठरले.

यानिमित्त तालुकास्तरीय लुघकथा लेखन स्पर्धा आयोजित केली असून प्रथम तीन क्रमांकांना रोख बक्षिस व प्रमाणपत्र तसेच पारितोषिक प्राप्त निवडक कथांना स्मरणिकेत प्रसिद्धी दिली जाणार आहे. इच्छुकांनी आपली लघुकथा साहित्य संमेलन व लघुकथा स्पर्धा असा उल्लेख करुन १० डिसेंबरपर्यंत साप्ताहिक किरात कार्यालय, बॅ. खर्डेकर रोड, वेंगुर्ले या पत्यावर पाठवावी. कवी संमेलनात सहभाग घेणाऱ्या कवींनी एक कविता वरील पत्यावर १५ डिसेंबरपर्यंत पाठवावी. कवितेच्या सोबत कविता स्वरचित असल्याचे हमीपत्रही जोडावे. तालुक्‍यातील अधिकाधिक लेखकांनी लघुकथा लेखन स्पर्धेत व कवी संमेलनात सहभाग घ्यावा, असे आवाहन आनंदयात्री वाङ्‌मय मंडळाने केले आहे.