डॉ. लान परिवाराच्या फोटोचे टपाल तिकीट

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 22 सप्टेंबर 2017

वेंगुर्ले -  येथील डॉ. द्वारकानाथ कोटणीस स्मृती समितीच्या प्रस्तावानुसार भारत सरकारच्या टपाल विभाग योजनेतर्फे डॉ. को चिंग लान यांच्या जन्मशताब्दी निमित्ताने त्यांच्या पत्नी डॉ. को चिंग लानसह परिवाराचे छायाचित्र गेट वे ऑफ इंडियाच्या फोटोसह टपाल तिकीट तयार करण्यात आले. टपाल तिकिटाचा प्रकाशन सोहळा २६ ला मुंबई येथील हॉटेल ताजमहाल येथे प्रजासत्ताक चीनच्या ६८ व्या प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमात होत आहे.

डॉ. को चिंग लान कोटणीस या वेंगुर्लेचे सुपुत्र डॉ. द्वारकानाथ कोटणीस यांच्या पत्नी होत. डॉ. द्वारकानाथ कोटणीस यांच्या निधनानंतर ७० वर्षे त्या डॉ. कोटणीस यांच्या पत्नी व भारताची सून म्हणून सेवाकार्य करीत होत्या. भारताचे पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी तसेच अन्य मान्यवर व कोटणीस परिवाराशी त्यांचे स्नेहपूर्ण संबंध होते. चीन सरकारने त्यांना राजदुताचा दर्जा दिला होता. त्यांनी चार वेळा भारतास भेट दिली होती. १९९९ साली त्यांना डॉ. कोटणीस यांचे शिक्षण झालेल्या रा. कृ. पाटकर हायस्कूल, वेंगुर्ले ग्रामीण रुग्णालय, डॉ. द्वारकानाथ कोटणीस स्मृती समितीचे कार्यालय व सचिव अतुल हुले यांच्या निवासस्थानी भेटी दिल्या होत्या.

डॉ. कोटणीस राहत असलेल्या निवासस्थानालासुद्धा त्यांनी भेट देऊन त्यांच्या स्मृतींना उजाळा दिला होता. वेंगुर्लेवासीयांना चांगली आरोग्य सुविधा मिळण्यासाठी महाराष्ट्र शासनाने ५० खाटांचे हॉस्पिटल बांधण्याचा निर्णय घेतलेला आहे व लवकरच या हॉस्पिटलचे भूमिपूजन होणार आहे. या हॉस्पिटलच्या माध्यमातून सर्वसामान्यांना उत्तम प्रकारच्या वैद्यकीय सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी प्रजासत्ताक चीन महाराष्ट्र शासनास सहकार्य करण्यास तयार आहे. मात्र या संबंधीचा निर्णय महाराष्ट्र शासनानेच घ्यावयाचा आहे.

डॉ. को-चिन लान सह डॉ. कोटणीस यांच्या भगिनी एकत्र असलेल्या फोटोसह गेट वे ऑफ इंडियाचे चित्र असलेला ५ रुपयांचे टपाल तिकीट बनविण्यात आलेले आहे. या टपाल तिकिटाचा प्रकाशन सोहळा डॉ. को-चिंग लान यांच्या जन्मशताब्दी निमित्ताने २६ ला मुंबई येथील हॉटेल ताजमहाल येथे होणार आहे. या कार्यक्रमास प्रजासत्ताक चीनचे कौन्सिल जनरल झेंग शियान, महाराष्ट्र शासनाचे मुख्य सचिव सुमित मलिक, महाराष्ट्राचे पोस्टमास्तर जनरल, महाराष्ट्र शासनाचे राजशिष्टाचार सचिव व अन्य मान्यवरांच्या उपस्थितीत होणार असून वेंगुर्ले येथून अतुल हुले यांना या कार्यक्रमासाठी निमंत्रित केले आहे.

Web Title: sindhudurg news Postage ticket on Lane Family