भर समुद्रात ट्रॉलरवर खलाशाची आत्महत्या

 भर समुद्रात ट्रॉलरवर खलाशाची आत्महत्या

मालवण - येथे भर समुद्रात ट्रॉलरवर खलाशाने गळफास लावून आत्महत्या केल्याचा प्रकार उघड झाला. मेढा येथील सतीश रामचंद्र आचरेकर यांच्या मासेमारी ट्रॉलरवरील मंजू वासुदेव गवडा (वय ३०, रा. वेळांबर, ता. अंकोला, कारवार कर्नाटक) असे या खलाशाचे नाव आहे. 

याबाबत सतीश आचरेकर यांनी मालवण पोलिस स्थानकात खबर दिली असून याप्रकरणी पोलिसांनी आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद केली आहे. मेढा येथील सतीश आचरेकर यांच्या श्री फुरसाई कृपा या मासेमारी ट्रॉलरवरून २१ ला सायंकाळी ६.३० वाजण्याच्या सुमारास सतीश आचरेकर यांच्यासह इतर अकरा मच्छीमार मालवण बंदरातून ४० वाव समुद्रात मच्छीमारीस गेले होते. यामध्ये तांडेल- अनिल पांडू खारवी, पागी- संजीव महादेव बानावळीकर, नागराज महादेव खारवी, खलाशी- पांडू लोको खारवी, संतोष खारवी, राजू खारवी, रोहित खडपकर, प्रथमेश आढाव, बबलू फर्नांडिस, गोट्या आढाव, मंजू वासुदेव गवडा आदींचा समावेश होता. रात्रभर मच्छीमारी केल्यानंतर २२ ला ट्रॉलर दिवसभर समुद्रातच थांबून होता. 

यानंतर रात्री जेवणखाण आटोपून ९ वाजण्याच्या सुमारास सर्वजण झोपी गेले. काही वेळानंतर महादेव बानावळीकर हा उठून ट्रॉलरच्या मागील बाजूस गेला असता त्याने लाईट लावली. या वेळी मंजू वासुदेव गवडा हा बोटीच्या मास्ट खांबाला मासेमारी जाळीच्या रोपच्या साहाय्याने गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसून आला. या वेळी महादेव बानावळीकर याने याबाबत इतरांना माहिती दिली असता लटकणाऱ्या स्थितीतील मंजू याला खाली उतरविले. यावेळी मंजू हा मृत झाल्याचे दिसून आले. या प्रकारामुळे सतीश आचरेकर यांनी मासेमारी बंद करून ते माघारी मालवण बंदरात परतले.

याबाबत सतीश आचरेकर यांनी मालवण पोलिस स्थानकात खबर दिली. यामध्ये मंजू गवडा याची मानसिक स्थिती बरोबर नसल्याने तो दोन दिवस विचित्र वागत होता तसेच त्याला दारूचे व्यसन होते, असे आचरेकर यांनी म्हटले आहे. याप्रकरणी पोलिसांनी आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद केली आहे. याबाबत पीएसआय श्री. चव्हाण, पोलिस हवालदार एस.टी. सोनावणे, श्री. गलोले हे अधिक तपास करत आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com