पूर्ण परतफेडीसाठी प्रयत्न करा - शरद पवार

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 29 मे 2018

सिंधुदुर्गनगरी - `जिल्ह्यात कर्जपरतफेड करण्याचे प्रमाण समाधानकारक आहे. येथील शेतकरी घतलेले कर्ज प्रमाणिकपणे फेडत असला तरी आंबा बागायतदारांकडून काही प्रमाणात कर्ज थकीत असल्याचे दिसते. तेही शंभर टक्के कर्जपरतफेड करतील, यासाठी प्रयत्न व्हावेत,` असे प्रतिपादन माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी केले.

सिंधुदुर्गनगरी - `जिल्ह्यात कर्जपरतफेड करण्याचे प्रमाण समाधानकारक आहे. येथील शेतकरी घतलेले कर्ज प्रमाणिकपणे फेडत असला तरी आंबा बागायतदारांकडून काही प्रमाणात कर्ज थकीत असल्याचे दिसते. तेही शंभर टक्के कर्जपरतफेड करतील, यासाठी प्रयत्न व्हावेत,` असे प्रतिपादन माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी केले.

लाईफ टाईम मेडिकल कॉलेजच्या उद्‌घाटनासाठी जिल्ह्यात आलेल्या माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी सिंधुदुर्ग जिल्हा बॅंकेला भेट दिली. या वेळी पवार यांनी जिल्हा बॅंकेची नवीन इमारत, बॅंकेच्या कामकाजाची पाहणी केली. जिल्हा बॅंकेच्या पडीक जमीन विकास कर्जयोजनेचा प्रारंभ जिल्हा बॅंकेच्या सभागृहात श्री. पवार यांच्या हस्ते झाला. 

सुनील तटकरे, आमदार अनिकेत तटकरे, जिल्हा बॅंकेचे अध्यक्ष सतीश सावंत, उपाध्यक्ष सुरेश दळवी उपस्थित होते.
श्री. पवार म्हणाले, ‘‘कर्ज थकीत असल्याने जिल्हा बॅंकांना वाचविण्यासाठी शासन प्रयत्न करीत असताना सिंधुदुर्ग जिल्हा बॅंक ही एकमेव बॅंक अशी होती, की जिचा व्यवहार सुस्थितीत होता. या बॅंकेचे कर्जपरतफेडीचे प्रमाण चांगले होते. जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी ही बॅंक प्रयत्न करत आहे.

पडीक जमीनलागवड कर्जयोजनेंतर्गत आंबा, काजू व बांबू लागवडीसाठी कर्जमागणी केलेल्या लाभार्थ्यांना श्री. पवार यांच्या हस्ते कर्जमंजुरीचे पत्र देण्यात आले. 

यांना मिळाला लाभ
 काजू : जागृती गायकवाड, चंद्रशेखर परब, नितीन गावडे, अशोक पराडकर  
 कुक्कुट पालन : समीक्षा सावंत,  प्रकाश म्हाडगुत 

...तर जिल्ह्यात हरित क्रांती होईल
जिल्हा बॅंकेने पडीक जमीन लागवडीखाली आणण्यासाठी कर्जयोजना सुरू केली आहे. या योजनेचा लाभ घेत शेतकऱ्यांनी आंबा व काजू बागायतीमध्ये आंतरपीक म्हणून बांबू लागवड केली तर शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढण्यास मदत होणार आहे. असे झाल्यास जिल्ह्यात हरित क्रांति नक्कीच होईल, असेही श्री. पवार म्हणाले.

Web Title: Sindhudurg News Sharad Pawar Comment