एसटी 1100 कनिष्ठ कर्मचाऱ्यांचे निलंबन मागे

तुषार सावंत
सोमवार, 25 जून 2018

कणकवली - एस.टीच्या अघोषित संपात सहभागी झाल्याबद्दल एस.टीच्या स्थानिक प्रशासनाने ज्या रोजंदारी कर्मचाऱ्यांच्या सेवा समाप्त करण्याचा निर्णय घेतला होता, त्यांना पुन्हा सेवेत घेण्याचे आदेश परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी दिले आहेत त्यामुळे एसटी महामंडळाच्या राज्यभरातील १ हजार १० कर्मचाऱ्यांना नव्याने नियुक्ती देण्यात येणार आहे.

या सर्व कर्मचाऱ्यांना १ जुलै २०१८ पासून नव्याने नियुक्ती दिली जाईल. तशा आदेशचे पत्र महाव्यवस्थापक माधव काळे यांनी एसटी महामंडळाच्या विभाग प्रमुखांना दिले़ एसटीच्या मेघा नोकरभरतीत हे रोजंदारी कर्मचारी महामंडळाच्या सेवेत मागील दोन ते तीन महिन्यांपूर्वीच रुजू झाले होते. या कर्मचाऱ्यांचा अघोषित संपाशी काहीही संबंध नव्हता तरी देखील हे कर्मचारी संपात सहभागी झाले होते. त्यामुळे एस.टीचे आर्थिक नुकसान होताना प्रवाशांची  प्रचंड प्रमाणात गैरसोय देखील झाली. या सर्व पार्श्वभूमीवर स्थानिक प्रशासनाने अशा सर्व कर्मचाऱ्यांचे निलंबन करण्यात आले होते. 

निलंबनाचा हा निर्णय मागे घेण्याबाबत प्राप्त झालेल्या विनंतीचा सकारात्मक विचार करून हा निर्णय मागे घेण्याबाबत परिवहन मंत्र्यांनी निदेश दिले होते. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने या आदेशाचे पालन करत अशा कर्मचाऱ्यांना पुन्हा नव्याने नियुक्ती देण्याचे निश्चित केले  असून, यासंदर्भातील परिपत्रक आज २५ जून रोजी निर्गमित केले आहे.

या परिपत्रकाप्रमाणे ज्या चालक तथा वाहक (कनिष्ठ) , सहाय्यक लिपिक-टंकलेखक (कनिष्ठ) यांनी ८ व ९ जून २०१८ रोजी झालेल्या अघोषित संपात सहभाग घेतला आहे व ज्यांची सेवा विभाग/ घटक प्रमुख यांनी समाप्त केली आहे अशा सर्व कर्मचाऱ्यांना १ जुलै पासून नव्याने नियुक्ती दिली जाईल असे महाव्यवस्थापकांनी काढलेल्या आदेशात नमूद करण्यात आले आहे

Web Title: Sindhudurg News ST workers debar decision cancelled