तीन वर्षांत आंब्याचे नवे तंत्रज्ञान - डॉ. तपस भट्टाचार्य

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 11 मे 2018

वेंगुर्ले - येत्या तीन वर्षांत आंब्यावरील संशोधन अधिक जास्त प्रमाणात करून नवीन प्रगत तंत्रज्ञान विकसित करू, अशी माहिती विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. तपस भट्टाचार्य यांनी पत्रकार परिषदेत दिली.

वेंगुर्ले - येत्या तीन वर्षांत आंब्यावरील संशोधन अधिक जास्त प्रमाणात करून नवीन प्रगत तंत्रज्ञान विकसित करू, अशी माहिती विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. तपस भट्टाचार्य यांनी पत्रकार परिषदेत दिली.

डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ तसेच इंटरडिसिप्लिनरी सोसायटी ऑफ अॅग्रीकल्चरल सायन्सस अँड टेक्‍नॉलॉजी यांच्यावतीने येथील प्रादेशिक फळ संशोधन केंद्रात झालेल्या आंतरराष्ट्रीय आंबा परिषदेनिमित्त विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. भट्टाचार्य यांनी पत्रकारांशी संवाद साधला. या वेळी सहयोगी संचालक डॉ. प्रदीप हळ्दवणेकर, डॉ. संजय भावे उपस्थित होते.

या आंबा परिषदेमुळे वेंगुर्ले प्रादेशिक फळ संशोधन केंद्राचा दर्जा वाढला असून लवकरच हे केंद्र आंब्यावर संशोधन करणारे राष्ट्रीय दर्जाचे केंद्र बनेल.
- डॉ. तपस भट्टाचार्य,
कुलगुरू कोकण कृषी विद्यापीठ

डॉ. भट्टाचार्य म्हणाले, ‘‘जगभरात कोकणचा हापूस आंबा पोचला. देश विदेशातून तज्ज्ञांनी येऊन याठिकाणी संशोधन केले; मात्र जागतिक स्तरावर आंब्याची म्हणावी तशी प्रसिद्धी झाली नाही. त्यामुळे विद्यापीठाने संशोधनातून केलेले कार्य जगासमोर यावे, या उद्देशाने आंबा परिषद घेतली.’’

ते म्हणाले, ‘‘दापोली कोकण कृषी विद्यापीठाच्या येथील प्रादेशिक फळ संशोधन केंद्राने गेल्या ४४ वर्षात कोकणातील हापूस आंबा आणि त्याच्या विविध प्रजातींवर महत्त्वपूर्ण असे संशोधन केले आहे. यात आवश्‍यक बदल करता यावे तसेच इतर संशोधनात्मक प्रयोग करता यावे या उद्देशाने या परिषदेचे आयोजन केले.

जगभरातील प्रमुख आंबा उत्पादक देशातील तज्ञांनी यात सक्रिय सहभाग घेतला आहे. कोकणात पूर्वी १० हजार हेक्‍टरवर असलेली आंबा लागवड आता १ लाख ७५ हजार हेक्‍टर पर्यंत पोहचलेली आहे. येथे स्थानिक आंबा शेतकरी मोठ्या प्रमाणावर असल्यामुळे घराघरात आंबा फळावर आधारित प्रक्रिया उद्योग सुरू झाले पाहिजे. तर तालुका पातळीवर त्यावर प्रोसेसिंग युनिट उभारून रोजगार निर्मिती केली जावी, अशा सूचना या परिषदेतून शास्त्रज्ञांकडून आलेल्या आहेत.’’

Web Title: Sindhudurg News Vic Chancellor Dr Tapas Bhattacharya