सिंधुदुर्गात तीन लाख चाकरमानी दाखल

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 5 सप्टेंबर 2016

कणकवली ः राष्ट्रीय महामार्गावर ठिकठिकाणी होणारी वाहतूक कोंडी, खड्डे, सर्वच रेल्वे गाड्यांना होणारा दोन ते अडीच तासांचा विलंब या सर्व विघ्नांवर मात करत राज्यभरातून तीन लाखांहून अधिक चाकरमानी गणेशोत्सवासाठी सिंधुदुर्गात दाखल झाले आहेत. यंदा पावसाने विश्रांती घेतल्याने जिल्ह्यात दाखल होणाऱ्या चाकरमान्यांची संख्या गतवर्षीपेक्षा अधिक आहे. दरम्यान, उत्सवाच्या पार्श्‍वभूमीवर बाजारात खरेदीसाठी गर्दी असून उलाढाल वाढली आहे. 

जिल्ह्यात येणाऱ्या चाकरमान्यांची कोणतीही गैरसोय होऊ नये, यासाठी जिल्हा पोलिस यंत्रणा आणि वाहतूक शाखेने चोख व्यवस्था ठेवली आहे. जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांत पावसाच्या सरी कोसळल्या. आज, मात्र दिवसभर पावसाने विश्रांती घेतल्याने गणेशभक्तांमध्ये खरेदीसाठी प्रचंड उत्साह जाणवला. जिल्ह्यातील सर्वच बाजारपेठा गर्दीने बहरून गेल्या होत्या. 

Web Title: Sindhudurga three million registered considered servants