सिंधुदुर्गात पावसाची पुन्हा मुसंडी

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 19 सप्टेंबर 2016

सिंधुदुर्गनगरी : जिल्ह्यात पावसाचा जोर पुन्हा वाढला आहे. आजही दिवसभर पावसाची संततधार सुरू होती. जिल्ह्यात पावसाची सुरवात थोडी उशिरा झाली; मात्र सततच्या पावसामुळे सरासरी 3208.37 पर्यंत पोचली. गणेश उत्सव काळात मात्र पावसाने पूर्णतः उघडीप घेतली होती. परतीच्या पावसाचे संकेत मिळू लागले होते; मात्र काल (ता. 15) पासून पुन्हा जोर वाढला आहे. काल सायंकाळी गणेश विसर्जन मिरवणुकांमध्ये पावसाच्या रिपरिपीचे विघ्न आले. रात्री उशिरापर्यंत पाऊस सुरू होता. यामुळे वातावरणात पुन्हा गारवा तयार झाला.
 
पावसाची संततधार आजही सुरू होती. पहाटेपासूनच याला सुरवात झाली. जिल्ह्यात गेल्या 24 तासांत सरासरी 45.95 मिलिमीटर इतक्‍या पावसाची नोंद झाली आहे. इतर तालुक्‍यातील पाऊस मिलिमीटरमध्ये असा ः दोडामार्ग 23, सावंतवाडी 49, वेंगुर्ले 51.60, कुडाळ 30, मालवण 105, कणकवली 32, देवगड 27, वैभववाडी 60.
 
पावसामुळे जिल्ह्यातील धरणांच्या पातळीतही समाधानकारक वाढ झाली आहे. तिलारी आंतरराज्य धरण प्रकल्पात 83.9 टक्के पाणीसाठा झाला आहे. या धरणाच्या पाणलोट क्षेत्रात आतापर्यंत 3265 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. देवघर (ता. कणकवली) या धरणातीतही 86.21 टक्के, कोर्ले सातंडी धरणात 100 टक्के पाणीसाठा झाला आहे. लघुपाटबंधारे प्रकल्पांपैकी शिवडाव, नाधवडे, ओटाव, आंबोली, हातेरी, माडखोल, निळेली, पावशी, शिरवल, पुळास, वाफोली, कारिवडे, हरकुळ, तिथवली या धरणामध्ये 100 टक्के पाणीसाठा झाला आहे. लोरे 97.63, शिरगाव 72.15, पोईप 58.24, ओझरम 94.50, ओसरगाव 95.82, धामापूर 98.98, दाभाचीवाडी 96.70, तळेवाडी डिगस 79.71, सनमटेंब 97.49, ओरोस ब्रु. 72.65, चोरगेवाडी 98.19, आडेली 85.56, तरंदळे 76 टक्के, तर देंदोनवाडी लघुपाटबंधारे प्रकल्पात 10.24 टक्के पाणीसाठा झाला आहे.
 
जोर आणखी वाढणार
जिल्ह्यात येत्या 24 तासांत पावसाचा जोर वाढण्याची शक्‍यता हवामान खात्याने वर्तवली आहे. वातावरणातही मोठे बदल दिसत आहेत. गेले आठ दहा दिवस स्वच्छ असलेले वातावरण आज दिवसभर ढगाळ होते.

Web Title: Sindhudurgata rising again thrust

टॅग्स