परदेशी युवतीची वृद्धाकडून छेड

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 21 डिसेंबर 2016

कुडाळ - परदेशी युवतीची छेड काढणाऱ्या साठ वर्षांच्या वृद्धाला झारापमध्ये जमावाने चोप दिला. गोव्यात सोडतो असे सांगून तिला निर्जन स्थळी नेऊन त्याने तिचा विनयभंग केला. त्याच्याविरूद्ध गुन्हा दाखल झाला आहे. ही युवती मूळची ब्राझिलची आहे. ती सध्या गोव्यात स्थायिक झाली आहे.

कुडाळ - परदेशी युवतीची छेड काढणाऱ्या साठ वर्षांच्या वृद्धाला झारापमध्ये जमावाने चोप दिला. गोव्यात सोडतो असे सांगून तिला निर्जन स्थळी नेऊन त्याने तिचा विनयभंग केला. त्याच्याविरूद्ध गुन्हा दाखल झाला आहे. ही युवती मूळची ब्राझिलची आहे. ती सध्या गोव्यात स्थायिक झाली आहे.

ही युवती आज दुपारी मडगावहून पणजीला एस.टीने येत होती. गाडीत तिला झोप लागली. गाडी सावंतवाडीत आल्यावर तिला जाग आली. त्यानंतर ती रिक्षामधून झाराप-पत्रादेवी बायपासवर आली. तेथे हा वृद्ध उभा होता. त्याने तिची परिस्थिती ओळखली. गोव्याला जाणाऱ्या बसमध्ये बसवतो असे सांगून त्याने तिला आपल्या गाडीवर बसविले. तेथून तिला निर्जनस्थळी नेले. तेथे तिचा विनयभंग केला. तिच्या तावडीतून कशीबशी सुटका करून घेत ती पुन्हा महामार्गावर पोचली. तेथे असलेल्या एका स्थानिक युवकाला हा प्रकार लक्षात आला. त्याने तिला धीर दिला आणि सावंतवाडी पोलिसांशी संपर्क साधला. याच दरम्यान तेथे सुमारे शंभर-दीडशेचा जमाव जमला. ते सर्वजण त्या वृद्धाला शोधण्यासाठी घटनास्थळी गेले. जमावाला पाहून तो घाबरून झाडावर चढून बसला, पण त्याला झाडावरून खाली ओढून जमावाने बेदम चोप दिला. मारहाणीत तो जखमी झाला. त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

दरम्यान, घटनास्थळी पोचलेल्या सावंतवाडी पोलिसांनी त्या युवतीला धीर देत कुडाळ पोलिस ठाण्यात तक्रार नोंदविण्यास सांगितले. त्यानुसार तिने तक्रार दाखल केली.

कोकण

सावंतवाडी - नारायण राणे हे मोठे नेते आहेत. ते भारतीय जनता पक्षात आल्यास माझे खाते मी त्यांना देण्यास कधीही तयार आहे; परंतु...

03.48 AM

राजापूर - "जमीन आमच्या हक्काची, नाही कोणाच्या बापाची', "भारत सरकार होश मे आओ, जैतापूर प्रकल्प रद्द करो', अशा जोरदार घोषणा...

03.03 AM

चिपळूण - रत्नागिरी जिल्हा कॉंग्रेसचे प्रभारी म्हणून विश्‍वनाथ पाटील यांची नियुक्ती प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केली....

01.24 AM