सुदर्शन यांच्या कलेमुळेच कार्यशाळेची प्रेरणा 

सुदर्शन यांच्या कलेमुळेच कार्यशाळेची प्रेरणा 

मालवण - निर्मल सागरतट अभियानअंतर्गत बंदर जेटी येथे सुदर्शन पटनाईक यांनी सुंदर वाळू शिल्प बनविले होते. त्यावेळी ही शिल्पे पाहण्यास आलेल्या विद्यार्थ्यांनी वाळू शिल्प कार्यशाळा घेण्यात यावी, अशी इच्छा व्यक्त केली होती. यानुसार चिवला बीच येथे वाळू शिल्प प्रशिक्षण कार्यशाळा घेण्यात येत आहे, असे मत जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी व्यक्त केले. 

महाराष्ट्र मेरीटाइम बोर्डातर्फे व निर्मल सागरतट अभियानाअंतर्गत चिवला बीच येथे घेतलेल्या वाळू शिल्प कार्यशाळा व प्रशिक्षण कार्यक्रमाचे उद्‌घाटन आज जिल्हाधिकारी उदय चौधरी यांच्या हस्ते झाले या वेळी ते बोलत होते. 

यावेळी वाळू शिल्पकार पद्मश्री सुदर्शन पटनाईक, प्रादेशिक बंदर अधिकारी कॅप्टन अजित टोपनो, नगराध्यक्ष महेश कांदळगावकर, नगरसेवक यतीन खोत, तहसीलदार रोहिणी रजपूत, सावंतवाडीचे सहायक वनसंरक्षक सुभाष पुराणिक, बंदर निरीक्षक शेखर वेंगुर्लेकर, सुषमा कुमठेकर, अमोल ताम्हणकर, सहायक बंदर निरीक्षक अनंत गोसावी, विश्राम घाडी, ममता हर्णे, साहेबराव आवळे, कनिष्ठ अभियंता विनायक एकावडे, पारेष शिंदे उपस्थित होते. या वेळी श्री. चौधरी यांच्या हस्ते वाळू प्रशिक्षण कार्यशाळेत सहभागी झालेल्या सहभागींना साहित्याचे वाटप करण्यात आले. 

सावंतवाडीचे सहायक वनसंरक्षक सुभाष पुराणिक म्हणाले, ""जगामध्ये नामशेष झालेला पांढऱ्या पाठीचा गिधाड पक्षी 2010 मध्ये देवबाग येथे दोन ठिकाणी सापडला होता. आज हा पक्षी देवबागमध्ये आढळून येत नाही. पांढऱ्या फुटाचा सागरी गरुड, मोठा धनेश यांसारखे पक्षी इथल्या किनारपट्टीवर आढळून येतात. हे पक्षी पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणावर पर्यटक येत असतात. त्यामुळे अशा प्रकारच्या पर्यटनाद्वारे स्थानिकांना रोजगार उपलब्ध होऊ शकतो.''

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com