सुधागड तालुका आदिवासी समाज शिवसेने सोबतच

shivsena
shivsena

पाली - राजकीय हितसंबंध, मतभेद किंवा वैयक्तिक स्वार्थसाठी अनेक राजकीय पुढारी व नेते पक्षांतर करत असतात. यावेळी आपल्या सोबत अनेक कार्यकर्ते देखील सोबत आल्याचा मोठा गाजावाजा केला जातो. मात्र हेच कार्यकर्ते जेव्हा अवघ्या दोन महिन्यातच आपल्या पुन्हा मूळ पक्षात गेलेल्या नेत्यासोबत परतत नाहीत आणि त्याने केलेला दावा फेटाळून लावतात तेव्हा खरी गंम्मत येते. सुधागड तालुक्यात नुकतीच अशी घटना झाली आहे.   

दोन महिन्यांपूर्वी आदिवासी जागतीक दिनाचे औचित्य साधून केंद्रीय अवजड उद्योगमंत्री अनंत गिते यांच्या उपस्थीतीत पालीत शिवसेना आयोजीत आदिवासी मेळाव्यात राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे पाली शहर उपाध्यक्ष अनुपम कुलकर्णी आणि त्यांच्या सहकार्‍यांसमवेत आदिवासी समाज बांधवांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला होता. मात्र शनिवारी (ता.22) अनुपम कुलकर्णी आपल्या सहकाऱ्यांसमवेत पुन्हा राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात आले. पण कुलकर्णी यांच्या सोबत मोठ्या संख्येने शिवसेनेत गेलेले आदिवासी बांधव आजही शिवसेनेतच असल्याचा दावा आदिवासी संघटनेच्या पदाधिकार्यांनी केला आहे.

सुधागड तालुका आदिवासी समाज शिवसेनेशी एकनिष्ठ व प्रामाणिक असून आजही शिवसेनेच्या सोबत आहे. व यापुढेही राहिल. राष्ट्रवादीतील पक्षप्रवेशाचा दावा खोटा असून आम्ही शिवसैनिकच असल्याचे पालीत रविवारी (ता.23) शिवसेना नेते व प्रमुख पदाधिकार्‍यांसमवेत पार पडलेल्या महत्वपुर्ण बैठकीत सुधागड तालुका आदिवासी समाज अध्यक्ष चंद्रकांत वाघमारे, अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेचे रायगड जिल्हाध्यक्ष कृष्णा वाघमारे यांच्यासह आदिवासी समाजाचे प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सांगितले. एवढेच नव्हे तर या बैठकीत केंद्रिय मंत्री अनंत गिते यांना दुरध्वनीवरुन थेट संपर्क साधून जय महाराष्ट्र साहेब, आम्ही शिवसेनेत आहोत व कायम शिवसेनेसोबतच राहू असा विश्वास आदिवासी समाज नेत्यांनी व कार्यकर्त्यांनी दिला. 

आदिवासी समाज अध्यक्ष चंद्रकांत वाघमारे म्हणाले की अनुपम कुलकर्णी यांनी शिवसेना सोडून राष्ट्रवादीत प्रवेश करताना आदिवासी समाज नेत्यांना व सहकार्‍यांना विश्वासात घेतले नाही. त्यामुळे सदर पक्षप्रवेश दिशाभूल करणारा आहे. 

यावेळी किशोर जैन म्हणाले की सुधागड तालुक्यात शिवसेनेला खिंडार पडले असल्याचे दाखविण्याचा केविलवाणा प्रयत्न केला जातोय. अनुपम कुलकर्णी यांनी शिवसेनेत प्रवेश करुन गवागवा केला. आदिवासी समाज बांधवांना सोबत घेवून ताकत दाखविली. परंतू जी राष्ट्रवादी त्यांना राजकीय स्थान देत नव्हती त्या पक्षातच त्यांनी पुन्हा प्रवेश केला. आदिवासी समाज आपल्यासोबत असल्याचे भासविले. मात्र प्रत्यक्षात सर्व आदिवासी समाज नेते व आदिवासी बांधव हे शिवसेनेसोबत राहिले आहेत. 

या बैठकीत शिवसेना सुधागड उपतालुकाप्रमुख सचिन जवके व संदीप दपके यांनी त्यांच्यावर केलेल्या आरोपाचे देखिल खंडण केले. बैठकीस जि.प सदस्य किशोर जैन व रविंद्र देशमुख, शिवसेना सुधागड तालुका प्रमुख मिलिंद देशमुख, शिवसेना सुधागड उपतालुका प्रमुख सचिन जवके, प्रमोद खोडागळे, राजेंद्र खरिवले, संदीप खरिवले, संदीप दपके, तसेच सुधागड तालुका आदिवासी समाज अध्यक्ष चंद्रकांत वाघमारे, कृष्णा वाघमारे, विश्वास भोय, बबन वाघमारे, लक्ष्मण पवार, विष्णु वाघमारे, दगडू वाघमारे, सुभाष पवार आदिंसह पाली सुधागड आदिवासी समाज बांधव उपस्थीत होते. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com