रिक्तपदे व घटणारी पटसंख्या जिल्हा परिषद शाळांच्या मुळावर

रिक्तपदे व घटणारी पटसंख्या जिल्हा परिषद शाळांच्या मुळावर

महाड : शिक्षण विभागातील रिक्त पदे, इंग्रजी माध्यम शाळांचे वाढते पेव व रोजगारासाठी शहरांकडे होणारे स्थलांतर यामुळे ग्रामीण भागातील जिल्हा परिषदेच्या शाळांची स्थिती चिंताजनक आहे. महाड तालुक्यात दोन वर्षांत 9 शाळा एकही विद्यार्थी नसल्याने बंद पडल्या आहेत. तर तालुक्यातील शाळांची पटसंख्या केवळ सव्वा सात हजारांवर आली आहे. दिवसेंदिवस घटणारी पटसंख्या व बंद होत असलेल्या शाळांमुळे ग्रामीण भागातील प्राथमिक शाळांबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

एकही विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये, यासाठी सरकारने शिक्षण हक्क कायदा केला आहे. तर गावागावात सर्व शिक्षा अभियानातून नव्या इमारतीही बांधण्यात आल्या आहेत. परंतु ग्रामीण भागातील नागरिक शहराकडे वळू लागल्याने खेडी ओस पडू लागल्या आहेत. दर्जेदार व इंग्रजी माध्यमाचे शिक्षण ही नव्या पिढीची गरज होऊ लागली आहे. याचा मोठा परिणाम जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांवर होत आहे. महाड तालुक्यातील कोकरे गोवेले, राजेवाडी,खेडेकर वाडी, अड्राई, सायपट्टी, वांद्रेकोंड, सोपे -गोवेले, साहिलनगर व जीते उर्दू या नऊ शाळा, शाळेत एकही विद्यार्थी नसल्याने या दोन वर्षात बंद झाल्या आहेत.

महाड तालुक्यातील 324 शाळा असून, शिक्षण विभागातील विस्तार अधिकारी  सर्व 6, केंद्रप्रमुख 9 ,पदवीधर शिक्षक  30 , व शिक्षकांची  66 अशी एकूण 111 रिक्तपदेही याला कारणीभूत आहेत, अशा अनेक कारणांमुळे दरवर्षी सरासरी पाचशे-सहाशे विद्यार्थीसंख्या घटत असते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com