वाहनांची हेडलाइट दिवसाही सुरू

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 16 मार्च 2017

सावंतवाडी - शोरूममध्ये नव्याने दाखल झालेल्या दुचाकी, चारचाकी गाड्यांना ऑटोमॅटिक हेडलाइट सिस्टीम (एएमओ) ही नवीन यंत्रणा आली आहे. यामुळे गाडी चालू केली, की गाड्यांच्या हेडलाइट आपोआपच सुरू राहणार आहेत. अपघात नियंत्रणासाठी केंद्र सरकारतर्फे हा निर्णय घेण्यात आला. १ एप्रिलपासून प्रदूषणमुक्तीसाठी बीएस-४ या नवीन इंजिनप्रणालीचा सर्वच वाहनांमध्ये समावेश करण्यात येणार आहे. 

सावंतवाडी - शोरूममध्ये नव्याने दाखल झालेल्या दुचाकी, चारचाकी गाड्यांना ऑटोमॅटिक हेडलाइट सिस्टीम (एएमओ) ही नवीन यंत्रणा आली आहे. यामुळे गाडी चालू केली, की गाड्यांच्या हेडलाइट आपोआपच सुरू राहणार आहेत. अपघात नियंत्रणासाठी केंद्र सरकारतर्फे हा निर्णय घेण्यात आला. १ एप्रिलपासून प्रदूषणमुक्तीसाठी बीएस-४ या नवीन इंजिनप्रणालीचा सर्वच वाहनांमध्ये समावेश करण्यात येणार आहे. 

सध्या अपघातांचे प्रमाण बरेच वाढत आहे. अपघात क्षेत्राच्या ठिकाणी त्याचबरोबर मोठ्या शहरात अपघात होणे ही कायमचीच बाब बनून राहिली आहे; अलीकडेच छोट्या शहरात, ग्रामीण भागात, निर्जन वाहतुकीच्या ठिकाणीही अपघाताचे प्रमाण वाढले आहे. अशा अपघातांना आळा बसावा या हेतूने सुरक्षितता म्हणून आता केंद्र शासनाने दुचाकी व चारचाकीसमोरील हेडलाइट इंजिनमध्ये ऑटोमॅटिक हेडलाइट सिस्टीम (एएमओ) ही नवीन यंत्रणा कार्यान्वित करण्याचा निर्णय घेतला होता. तशी अंमलबजावणी आता झाली आहे. या यंत्रणेमध्ये दुचाकीला चावी देऊन ती सुरू केली की दुचाकीसमोरील हेडलाइट सुरूच राहणार आहे. चावी बंद करेपर्यंत समोरील हेडलाइट उजेडाने पेटताना दिसणार आहे. राज्यातील विविध शोरूममध्ये अशा नवीन यंत्रणेच्या दुचाकी गाड्या जानेवारी महिन्यापासून दाखलही झाल्या आहेत. येत्या काही दिवसांत जिल्ह्यातील रस्त्यावर रात्री सोबत दिवसाच्याही या दुचाकी गाड्या धावतानाही दिसणार आहेत, तर चारचाकी वाहनामध्येही समोर छोट्या (इंडिकेटर) दिशादर्शक लाईटच्या बाजूला एलईडी प्रकारच्या छोट्या लाईट प्रणालीचा वापर केला आहे. या दोन्हीच्या या नवीन इंजिन प्रणालीची निर्मिती देशातील संबंधित वाहन इंजिन बनविणाऱ्या कंपनीने यापूर्वीच केली होती. तशाप्रकारच्या सूचना केंद्र सरकारमार्फत देण्यात आल्या होत्या. जानेवारी महिन्यापासून अशा दुचाकी गाड्या शोरूममध्ये दाखलही झाल्या आहेत, अशी माहिती काही शोरूम अधिकाऱ्यांकडून देण्यात आली.

प्रदूषणमुक्तीसाठी इंजिनप्रणालीत बदल
प्रदूषणमुक्तीसाठी १ एप्रिलपासून दुचाकी व चारचाकी वाहनातील इंजिनप्रणालीमध्ये बदल होणार आहेत. यात आता बीएस-४ इंजिन प्रणालीचा समावेश करण्यात येणार आहे. त्यामुळे वाहनातून येणाऱ्या धुरांवर काही प्रमाणात प्रतिबंधात्मक प्रक्रिया होणार आहे. वाढते श्‍वसनाचे आजार कमी होण्यासाठी हा निर्णय घेण्यात येणार आहेत. अगोदर असलेले बीएस-३ इंजिनप्रणालीच्या वाहनांची नोंद होणार नाही.

Web Title: vehicle headlight on the day