दात्यांमुळे वेंगुर्ले शाळा डिजिटल

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 6 एप्रिल 2017

वेंगुर्ले - इंटरनेटच्या जमान्यात शेतकऱ्यांच्या मुलांना दर्जेदार शिक्षण मिळण्यासाठी लोकसहभागातून प्राथमिक शाळा डिजिटल होत आहेत. सुरेंद्र ऊर्फ बाळू खांबकर यांच्यासारख्या दानशूर दात्यांमुळे वेंगुर्ले शाळा क्रमांक चार डिजिटल झाली, असे मत माजी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संग्राम प्रभुगावकर येथे यांनी येथे व्यक्त केले.

घन:श्‍याम विश्राम खांबकर व मंगला घन:श्‍याम खांबकर यांच्या स्मरणार्थ सुरेंद्र ऊर्फ बाळू खांबकर यांच्याकडून मिळालेल्या डिजिटल स्कूल साहित्यामुळे वेंगुर्ले शाळा क्रमांक चार प्रगत डिजिटल शाळा झाली. या प्रगत डिजिटल शाळेचा प्रारंभ नगराध्यक्ष राजन गिरप यांच्या अध्यक्षतेखाली व जिल्हा परिषद अध्यक्ष संग्राम प्रभूगावकर यांच्या हस्ते झाला. या वेळी श्री. प्रभूगावकर बोलत होते. व्यासपीठावर पंचायत समितीचे सभापती यशवंत परब, उपसभापती स्मिता दामले, उपनगराध्यक्षा अस्मिता राऊळ, नगरसेवक सुहास गवंडळकर, यशवंत ऊर्फ दाजी परब, मुख्याध्यापिका संध्या बेहरे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षा दिशा गावडे, जिल्हा बॅंकेच्या संचालिका प्रज्ञा परब, सुरेंद्र खांबकर, संध्या खांबकर, श्रीनिवास गावडे, केंद्रप्रमुख भास्कर पुरलकर, दिगंबर नाईक, सीमा नाईक, उपशिक्षणाधिकारी रामचंद्र आंगणे, नगरसेवक विधाता सावंत उपस्थित होते.

यावेळी शाळा डिजिटल करण्यासाठी साहित्य देणारे सुरेंद्र खांबकर व संध्या खांबकर, शाळेला लॅपटॉप देणारे दिगंबर नाईक यांचा संग्राम प्रभूगावकर यांच्या हस्ते सत्कार झाला. तसेच श्री. प्रभूगांवकर, यशवंत परब, स्मिता दामले, अस्मिता राऊळ यांचा सत्कार सुहास गवंडळकर व श्रीनिवास गावडे यांच्या हस्ते झाला. या वेळी दिलीप गिरप व यशवंत परब यांनी मनोगत व्यक्त केले. राजू वजराठकर यांनी सूत्रसंचालन केले.

Web Title: vengurle school digital by surendra khambkar