संगमेश्‍वरचा चित्रकार कोल्हापुरात झळकणार 

संगमेश्‍वरचा चित्रकार कोल्हापुरात झळकणार 

साडवली - पुणे सेंट्रल रेल्वे विभागाच्या पुढाकाराने कोल्हापूर रेल्वे स्टेशनचे रुपडे पालटण्याचे काम सुरू आहे. या पार्श्‍वभूमीवर शिवाजी विद्यापीठाचे चित्र कोल्हापूर रेल्वे स्टेशनवर झळकणार आहे. 

देवरूखजवळील सोनवडे विद्यालयातील कलाशिक्षक विष्णू परीट यांना हे चित्र रेखाटण्याचा मान मिळाला. विष्णू परीट यांनी दोन बाय दीडच्या कॅनव्हासवर हे चित्र रेखाटले. महाराष्ट्रातून 40 चित्रकारांना पुणे सेंट्रल रेल्वे विभागाने चित्रे रेखाटण्यासाठी निमंत्रित केले होते. रत्नागिरी जिल्ह्यातून निवड झालेले विष्णू परीट हे एकमेव होते. ऑगस्ट महिन्यात तीन दिवसांत या चित्रकारांनी हे काम पूर्ण केले. विष्णू परीट यांनी कॅम्लिन ऍक्रॅलिक रंगात कोल्हापूर शहराचे भूषण असलेले शिवाजी विद्यापीठ हुबेहूब कॅनव्हासवर उतरवले आहे. परीट जलरंगासाठी प्रसिद्ध आहेत. त्यांची अनेक निसर्गचित्रे प्रदर्शनातून गाजली आहेत. 
 
1962 ला 853 एकर परिसरात दिमाखात उभे राहिलेले शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर शहराचे भूषण आहे. बहुजन समाजाच्या शैक्षणिक वाटचालीतील अस्मिता आणि प्रेरणास्थान आहे. हे चित्र मला रेखाटण्यास मिळाले हेच माझे भाग्य आहे.
- विष्णू परीट,
चित्रकार 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News
www.esakal.com