वारणा जलसेतू धोकादायक;वळण सुधारितसाठी प्रस्ताव 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 19 मार्च 2017

कोकरूड- खुजगाव (ता. शिराळा) येथील कोकरूड-शेडगेवाडी रस्त्यावरील वारणा जलसेतू जवळील धोकादायक वळण अपघात प्रवण क्षेत्र सुधारित करण्यासाठी लागणाऱ्या निधीसह प्रस्ताव मंजुरीसाठी पाठविला आहे. अशी माहिती शिराळा सार्वजनिक बांधकाम विभागाचे सहायक उपअभियंता एस. एल. दाभोळे यांनी "सकाळ'ला दिली. 

कोकरूड- खुजगाव (ता. शिराळा) येथील कोकरूड-शेडगेवाडी रस्त्यावरील वारणा जलसेतू जवळील धोकादायक वळण अपघात प्रवण क्षेत्र सुधारित करण्यासाठी लागणाऱ्या निधीसह प्रस्ताव मंजुरीसाठी पाठविला आहे. अशी माहिती शिराळा सार्वजनिक बांधकाम विभागाचे सहायक उपअभियंता एस. एल. दाभोळे यांनी "सकाळ'ला दिली. 

धोकादायक वळणावर वाहन चालक प्रवास करताना समोरील वाहनांचा अंदाज येत नसल्यामुळे वारंवार अपघाताच्या घटना घडत आहेत. या अपघातात अनेक वाहनचालकांचा मृत्यू झालेल्या घटना वारंवार घडत आहेत. ही मालिका सुरूच आहे. या वारणा जलसेतू जवळील धोकादायक वळणाचा प्रामुख्याने हा भाग एकेरी व्हावा यासाठी माजी उपसभापती उत्तम पाटील यांनी पाठपुरावा सुरू ठेवला आहे. 

त्यांनी सार्वजनिक बांधकाम विभाग व कृष्णा खोरे विभाग यांच्या अधिकाऱ्यांना बोलवून पंचायत समितीच्या मासिक सभेत पाठपुरावा सुरू ठेवला होता. त्यांच्या निर्दशनास हे अपघात प्रवण क्षेत्राची बाब आणून दिली. त्यानुसार सार्वजनिक बांधकाम विभागाचे सहायक उपअभियंता दाभोळे व कृष्णा खोरे विभागाचे उपविभागीय अभियंता एस. ए. मोरे यांनी संयुक्‍तपणे अपघात क्षेत्राची 17 जानेवारीला पाहणी केली. त्यानंतर शिराळा सार्वजनिक विभागाकडून अपघात प्रवण क्षेत्राचा प्रस्ताव तयार केला, वरिष्ठ कार्यालयाकडे पाठविला आहे. 

अन्यथा चक्‍का जाम 
खुजगाव जलसेतू अपघात प्रवण क्षेत्राचा बांधकाम विभागाकडून निधीचा प्रस्ताव शासनाकडे पाठविला, असे अधिकारी सतत बोलत आहेत. परंतु लवकरात लवकर प्रस्ताव मंजूर करण्यासाठी अधिकाऱ्यांनी पाठपुरावा करून त्यांचे टेंडर काढवे, अन्यथा खुजगावसह परिसरातील ग्रामस्थांतफे चक्‍का जाम आंदोलन करण्यात येईल, असा इशारा माजी उपसभापती उत्तम पाटील यांनी दिला. 

 

Web Title: warna bridge is in dangerous condition