एैन पावसाळ्यात पालीत पाणी टंचाई संकट

pali
pali

पाली - एैन पावसाळ्यात पालीकरांना पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे. मागील चार ते पाच दिवसांपासून पालीत पाणी येत नाही. तर महिनाभरापासून अनियमित पाणी पुरवठा होत आहे. त्यामुळे एैन पावसाळ्यात पालीकरांवर पाणी टंचाईचे संकट ओढावले आहे. काही ठिकाणी तर चक्क टँकरने पाणी आणावे लागले. तर काही ठिकाणी पागोळीच्या पाण्याचा आधार घ्यावा लागत आहे.

येथील मिनिडोअर स्टँडजवळ शनिवारी (ता.२१) मोठे झाड कोसळले होते त्या झाडाखाली जमिनितून जाणार्या नळ वाहिण्या तुटल्या आणि त्यामुळे पालीतील पाणी पुरवठा बंद झाला. ग्रामपंचायत माजी सदस्य संजय (आप्पा) घोसाळकर यांनी पुढाकार घेवून ग्रामपंचायत कर्मचार्यांच्या मदतीने बुधवारी (ता.२५) हे नळ वाहिणी दुरस्तीचे काम हाती घेतले. मात्र गुरुवारी (ता.२६) सकाळी पाणी पुरवठा सुरळित झाला नव्हता.

पाणी टंचाईविरोधात मागील आठवड्यात तर येथील खडक आळीतील व इतर काही महिलांनी तहसिल कार्यालय व ग्रामपंचायतीवर धडक मोर्चा नेला होता. पाणी येत नसल्याने पालीकरांचे पुरते हाल झाले आहेत. ज्यांच्याकडे किंवा जवळपास एखादी बोअरवेल किंवा विहिरी आहे त्यांना तेथून पाणी भरावे लागते.या परिस्थितीत अनेकांनी आपल्या शेजार्यांना विहीरिचे आणि बोअरवेलचे पाणी देवून शेजारधर्म पळला. मात्र या दोन्हींची सोय जिथे नाही तेथील नागरीकांचे मात्र पुरते हाल होत आहेत. त्यांना दुरवरुन पाणी आणावे लागत आहे. तर कधी विकतचे पाणी आणवे लागते. काही सोसायटिंमध्ये पाण्याचे टँकर मागविण्यात आले आहेत.तर काही इमारतींमधील लोक पावसाचे पागोळीतून आलेले पाणी जमा करुन वापरत आहेत. पाण्यासाठी नागरिकांची मोठी फरपट होत आहे.

दाद कोणाकडे मागावी ?
सध्या पाली ग्रामपंचायतीचा पाच वर्षाचा कार्यकाल संपुष्टात आला आहे. पालीत नगरपंचायत होणार की ग्रामपंचायत राहणार हा संभ्रम अजुन कायम आहे. तसेच अजुनही प्रशासकाची नेमणूक झालेली नाही. त्यामुळे दाद नक्कि कोणाकडे मागायची हा प्रश्न समग्र पालीकरांना पडला आहे.

वारंवार पाणी टंचाईचे सावट
अष्टविनायकापैकी बल्लाळेश्वराचे स्थान असलेल्या पालीत वारंवार पाणी टंचाईची समस्या तोंड वर काढते.. येथील अंबा नदितून पालीकरांना पाणी पुरवठा होतो. उन्हाळ्यात सुद्धा नदीत मुबलक व पुरेसे पाणी असते. मात्र फुटणारे जुने व जिर्ण झालेले पाईप, साठवण टाक्यांची अपुरी क्षमता. वारंवार नादुरस्त होणारे पंप, जॅकवेलमध्ये गाळ साठणे, वारंवार खंडित होणारा विज पुरवठा व अपुरे कर्मचारी अशा असंख्य कारणांमुळे पालीत नेहमी पाणी टंचाई भेडसावते.

शुद्ध पाणी केव्हा ?
फक्त निवडणूकीसाठी भांडवल 
पालीकरांना गढूळ व अशुद्ध पाणी प्यावे लागत आहेत. पालील शुद्ध नळ पाणीपुरवठा योजना मागील १५ ते २० वर्षांपासून प्रलंबित आहे.योजनेसाठी कोट्यावधी रुपयांचा निधी मंजूर होऊन देखिल अाजतायागत हि योजना कार्यान्विय झालेली नाही. सर्वच राजकिय पक्ष व त्यांचे पुढार्यांनी या योजनेचे निवडणूकी पुरते भांडवल करतात. 

शुद्ध नळपाणी योजना अडकली लालफितीत 
शासनाने केलेल्या 2008 -09 च्या सर्व्हेनुसार पालीची लोकसंख्या व पालीत दररोज येणार्‍या भाविक व पर्यटकांच्या संख्येनुसार शुद्ध नळपाणी पुरवठा योजनेचे नियोजन केले होते. एकूण 7 कोटी 79लाखाचा निधी व 10 टक्के लोकवर्गणीद्वारा नळयोजना उभी राहणार होती. परंतू राजकीय श्रेयवादामध्ये हि योजना रखडली गेली. त्याबरोबर १० टक्के लोकवर्गणीचा प्रश्न देखिल होता. नुकताच पालीला ‘’ब’’ वर्ग पर्यटनस्थळाचा दर्जा मिळाला आहे. तसेच शुद्ध नळपाणी पुरवठा योजनेसाठी ११ कोटी ७० लाख रुपयांचा निधी मंजुर झाला आहे. लोकवर्गणीची अट शिथील करण्यात आली आहे.

गेल्या कित्येक दिवसांपासून पाणी येत नाही. पाण्यासाठी पावसाच्या पागोळीच्या पाण्याचा वापर करतो. मात्र आता पाऊसही पुरेसा पडत नसल्याने पाण्याचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. घरातील सर्व मंडळींना घेवून विहिर किंवा बोअरवेल वरुन दुरुन पाणी आणावे लागणारे.
छाया म्हात्रे, रहिवासी , पाली,

वारंवार अनियमित पाणी पुरवठ्या मुळे सर्वच महिला त्रस्त झाल्या आहेत. त्यामुळे संतापुन आम्ही महिलांनी मिळून पाली तहसिल कार्यालय व ग्रामपंचायतीवर मोर्चा काढला. पण अजुनही अामचा प्रश्न सुटलेला नाही. यावर प्रशासनाने व राजकिय पुढार्यांनी ताबतोब लक्ष द्यावे.
सुनिता शिंदे, रहिवासी, खडक आळी, पाली

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com