कवितेच्या ओळी आळवत ‘तुतारी’ एक्‍स्प्रेसचे स्वागत

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 24 मे 2017

रत्नागिरी - ‘एक तुतारी दे मज आणून...’ केशवसुतांच्या या कवितेच्या ओळी आळवत कोकण मराठी साहित्य परिषदेच्या कार्यकर्त्यांसह भाजप पदाधिकारी व रत्नागिरीकरांनी ‘तुतारी’ एक्‍स्प्रेसचे रेल्वेस्थानकावर स्वागत केले. कोकणचा खऱ्या अर्थाने हा सन्मान झाल्याच्या प्रतिक्रिया उपस्थितांनी व्यक्‍त केल्या.

कोकण रेल्वे मार्गावर धावणाऱ्या ‘राज्यराणी एक्‍स्प्रेस’चे नाव बदलून ‘तुतारी एक्‍स्प्रेस’ करण्यात आले. सावंतवाडी येथे या गाडीचे नवीन नामकरण केल्याचे रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी जाहीर केले. सोमवारी (ता. २२) सायंकाळी ही गाडी दादरकडे रवाना झाली. रात्री साडेदहाच्या सुमारास तुतारी एक्‍स्प्रेसचे रत्नागिरी स्थानकात आगमन झाले. मालगुंड हे कवी केशवसुतांचे जन्मगाव. त्यामुळे मालगुंडवासीयांनीही स्वागतासाठी हजेरी लावली होती. कोमसापचे अरुण नेरुरकर, प्रशांत परांजपे, रमेश कीर, गजानन पाटील, सौ. साधना साळवी, कवितेच्या ओळी आळवत ‘तुतारी’ एक्‍स्प्रेसचे स्वागत शरद बोरकर, अभिजित नांदगावकर, युयुत्सू आर्ते, भाजपचे उमेश कुलकर्णी, ॲड. विलास पाटणे, बाळा मयेकर यांच्यासह अनेकजणं उपस्थित होते.

गाडीचे आगमन झाल्यानंतर तुतारी कवितेच्या ओळी गुणणुणत कोमसाप आणि मालगुंडच्या कोकणरत्न प्रतिष्ठानचे फलक रेल्वेच्या दर्शनी लावण्यात आले. याप्रसंगी तुतारीचे चालक श्री. घाडगे यांचा सत्कार करण्यात आला. कोमसापच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह ओसंडून वाहत होता.

‘‘कोकण रेल्वे मार्गावर धावणाऱ्या गाडीला कवी केशवसुतांच्या ‘तुतारी’चे नाव द्यावे अशी मागणी कोमसापतर्फे आठ ते दहा वर्षांपूर्वी करण्यात आली होती. ती रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्यामुळे पूर्ण झाली आहे. हा खऱ्या अर्थाने कोकणवासीयांचा सन्मान आहे.’’
- प्रशांत परांजपे, कार्यवाह, कोमसाप