पाच पंचायत समित्यांवर महिलाराज

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 31 जानेवारी 2017

आरक्षण जाहीर - अनेकांचा हिरमोड; काहींच्या आशांना धुमारे, ५ ठिकाणी सभापतिपद राखीव 

रत्नागिरी - जिल्ह्यातील नऊ पंचायत समिती सभापतींची पुढील अडीच वर्षांसाठीची आरक्षण सोडत आज जिल्हाधिकारी प्रदीप पी. यांच्या उपस्थितीत काढण्यात आली. विशेष म्हणजे रत्नागिरीसह ५ ठिकाणी महिलांसाठी राखीव आरक्षण पडल्याने येथे महिलाराज असेल. राजापूर नागरिकांचा मागास प्रवर्ग; तर मंडणगड, लांजा, दापोलीला सर्वसाधारण (खुला प्रवर्ग) आरक्षण आहे. यामुळे अनेक ठिकाणी इच्छुकांच्या पदरी निराशा पडली. खुल्या आरक्षणामुळे मात्र काही जणांच्या इच्छेला अंकुर फुटले. 

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहामध्ये सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास ही सोडत काढण्यात आली. या वेळी अपर जिल्हाधिकारी श्री. बेलदार, निवासी जिल्हाधिकारी सारंग कोडोलकर, नायब तहसीलदार श्री. दांडेकर आदी उपस्थित होते. अतिशय नेटकेपणाने ही सोडत काढली.

अवघ्या २० मिनिटांत ही प्रक्रिया संपली. १९९५ पासून पडलेल्या आरक्षण तक्‍त्याचा आधार घेऊन सोडत झाली. सुरवातीला नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी सोडत काढली. संगमेश्‍वर, चिपळूण, गुहागर, खेड, दापोली येथे यापूर्वी हे आरक्षण होते. राजापूर, मंडणगड, रत्नागिरी आणि लांजा येथे एकदाच आरक्षण होते. त्यामुळे राजापूर आणि रत्नागिरीत नागरिकांचा मागास प्रवर्ग आणि नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला राखीवसाठी सोडत काढण्यात आली. इयत्ता चौथीमध्ये शिकणाऱ्या पल्ल्वी निमरे या मुलीने सोडतीच्या चिठ्ठ्या काढल्या. यात राजापूरला नागरिकांचा मागास प्रवर्ग आणि रत्नागिरी पंचायत समितीसाठी नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला असे आरक्षण निश्‍चित झाले.  

दुसऱ्या टप्प्यात सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी सोडत काढण्यात आली. त्यात दापोली, राजापूर, मंडणगड, रत्नागिरी, लांजा पंचायत समितींना यापूर्वी तीन ते चार वेळा हे आरक्षण पडल्याने त्यांना या प्रक्रियेतून वगळण्यात आले.

संगमेश्‍वर, चिपळूण, गुहागर या जागा सर्वसाधारण महिलेसाठी राखीव ठेवण्यात आल्या. खेड, मंडणगड आणि संगमेश्‍वरसाठी सोडत काढण्यात आली. त्यामध्ये खेडला सर्वसाधारण महिला आरक्षण पडले. उर्वरित राहिलेल्या मंडणगड, लांजा आणि दापोली हे तीन पंचायत समिती सभापतिपद सर्वसाधारण म्हणजे खुल्या प्रवर्गासाठी राखीव ठेवण्यात आले. सोडतीनंतर जिल्ह्यात महिला सभापतींचे राज्य येणार हे स्पष्ट झाले आहे. काही ठिकाणी खुले आरक्षण पडल्याने त्या तालुक्‍यातील नेतेमंडळींना दिलासा मिळाला आहे. 

पंचायत समिती सभापती आरक्षण पुढीलप्रमाणे
राजापूर    नामाप्र खुला प्रवर्ग 
रत्नागिरी    नामाप्र महिला (ओबीसी) 
संगमेश्‍वर    सर्वसाधारण महिला 
चिपळूण    सर्वसाधारण महिला 
गुहागर    सर्वसाधारण महिला 
खेड    सर्वसाधारण महिला 
मंडणगड    सर्वसाधारण 
दापोली    सर्वसाधारण 
लांजा    सर्वसाधारण

Web Title: women on panchyat committee