मैत्रिणीचे अपहरण फसल्याने चिपळूण येथे तरुणाची आत्महत्या

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 6 एप्रिल 2017

चिपळूण - मैत्रीण सोबत आली नाही. तिच्या अहरणाचा प्रयत्नही फसला. त्यानंतर मुलीला फूस लावून पळविल्याचा गुन्हा दाखल झाल्यामुळे निराश झालेल्या तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रामपूर-रोहिदासवाडी येथील प्रवीण श्रीकृष्ण कदम (वय 28) याच्यावर एका 19वर्षीय तरुणीचे अपहरण केल्याचा गुन्हा काही महिन्यांपूर्वी चिपळूण पोलिस ठाण्यात दाखल झाला होता. त्यानंतरही मंगळवारी (ता. 4) पुन्हा एकदा त्याने त्याच तरुणीचे अपहरण करण्याचा प्रयत्न केला. प्रवीण तरुणीसह सावर्डे-भुवडवाडी येथे गेला. तिथे अंधाराचा फायदा घेत त्या तरुणीने आपली सुटका करून घेतली. आपले न ऐकता मैत्रीण पळून गेल्याचा राग प्रवीणला आला. त्याने सावर्डे-दहिवली या रस्त्यावर तांबेवाडी फाट्याजवळ झाडावर नायलॉनच्या दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली.
Web Title: youth suicide in chiplun