एजॉलचे दोन फुटबॉलपटू ईस्ट बंगालकडून करारबद्ध

पीटीआय
बुधवार, 24 मे 2017

कोलकाता - आय-लीग फुटबॉल स्पर्धेतील ऐतिहासिक विजेतेपदानंतर एजॉल एफसीच्या खेळाडूंना चांगलाच भाव मिळत आहे. ईस्ट बंगालने लालरामचुल्लोवा आणि महमौद अल्‌ अम्ना या दोघांना करारबद्ध केले. ईस्ट बंगालला गुणतक्‍त्यात तिसरे स्थान मिळाले. पुढील मोसमासाठी ईस्ट बंगालने आतापासूनच मोर्चेबांधणी सुरू केली आहे. महमौद ३४ वर्षांचा, तर लालराचुल्लोवा २१ वर्षांचा आहे. एजॉलच्या यशात त्यांचे योगदान बहुमोल मानले जाते. महमौदला कोलकाता फुटबॉल लीगपुरते करारबद्ध करण्यात आले, तर लालरामचुल्लोवा याच्याशी एक वर्षाचा करार करण्यात आला.