रेल्वेचा महाराष्ट्राला धक्का; केरळने पंजाबला रोखले

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 18 मार्च 2017

बांबोळी ः संतोष करंडक फुटबॉल स्पर्धेत शुक्रवारी झालेल्या लढतीत केरळच्या शेरीन सॅम याच्या स्वयंगोलमुळे पंजाबने आघाडी घेतली तो क्षण.

बांबोळी ः संतोष करंडक फुटबॉल स्पर्धेत शुक्रवारी झालेल्या लढतीत केरळच्या शेरीन सॅम याच्या स्वयंगोलमुळे पंजाबने आघाडी घेतली तो क्षण.

पणजी - महाराष्ट्राला 71व्या संतोष करंडक राष्ट्रीय फुटबॉल स्पर्धेत सलग दुसऱ्या पराभवाचा सामना करावा लागला. वॉस्को येथील टिळक मैदानावर शुक्रवारी झालेल्या सामन्यात रेल्वेने गतउपविजेत्या महाराष्ट्राला 1-0 असा धक्का दिला. महाराष्ट्राच्या राहुल दास याने 32व्या मिनिटाला केलेला स्वयंगोलच रेल्वेला विजय मिळवून देणारा ठरला. दुसऱ्या सामन्यात भरपाई वेळेतील गोलने केरळने पंजाबला पिछाडीवरून 2-2 असे बरोबरीत रोखले.

बांबोळी येथे झालेल्या केरळ वि. पंजाब सामन्यात प्रशिक्षक व्ही. पी. शाजी यांचा विश्‍वास सार्थ ठरविताना बदली खेळाडू महंमद पाराक्कोट्टिल याने शेवटच्या मोजक्‍या मिनिटांच्या खेळात दोन गोल केले. त्यापैकी एक गोल भरपाई वेळेतील होता. या कामगिरीमुळेच केरळला "ब' गटातील लढतीत पंजाबला बरोबरीत रोखता आले. रंगतदार झालेल्या या सामन्यातील चारही गोल उत्तरार्धात झाले.

केरळच्या शेरीन सॅम याने 49व्या मिनिटास स्वयंगोल केल्याने पंजाबला आघाडी मिळाली. नंतर 57व्या मिनिटास केरळच्या बचाव फळीतील त्रुटीचा लाभ उठवत मानवीर सिंग याने पंजाबला 2-0 असे आघाडीवर नेले. सामन्याच्या 79व्या मिनिटास पाराक्कोट्टिल बदली खेळाडू म्हणून मैदानात आला. त्याने 89व्या मिनिटास जॉबी जस्टिनच्या शानदार क्रॉस पासवर भेदक हेडरवर गोलरक्षक परमजित सिंग याला चकवून केरळची पिछाडी कमी केली. नंतर भरपाई वेळेतील चौथ्या जस्टिनच्याच "असिस्ट'वर पाराक्कोट्टिलने पुन्हा एकदा पंजाबच्या गोलरक्षकाचा बचाव भेदत केरळला 2-2 अशी बरोबरी साधून दिली.

"ब' गटात आता पंजाबचे दोन बरोबरी व एका विजयामुळे पाच गुण झाले आहेत. केरळने दोन सामन्यांतून चार गुणांची कमाई केली आहे. पंजाब व केरळविरुद्ध हार पत्करलेल्या रेल्वेच्या खाती तीन गुण आहेत; तर महाराष्ट्राला दोन पराभवांमुळे अजून गुण मिळविता आलेला नाही.

क्रीडा

सॉल्ना, स्टॉकहोम, स्वीडन - मॅंचेस्टर युनायटेडच्या फुटबॉलपटूंनी जिद्दीने खेळत ॲजेक्‍स ॲमस्टरडॅम संघाला हरवून प्रतिष्ठेचा...

10.51 AM

नवी दिल्ली : भारतीय क्रिकेट संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदासाठी नव्याने अर्ज मागविण्याची प्रक्रिया सुरू करणार असल्याची माहिती...

गुरुवार, 25 मे 2017

नवी दिल्ली - भारताची ऑलिंपिक रौप्यपदक विजेती पी. व्ही. सिंधू हिची जागतिक बॅडमिंटन महासंघाच्या खेळाडू आयोगावर सर्वाधिक मतांनी निवड...

गुरुवार, 25 मे 2017