इडाथोडिका, लिंगडोह ठरले कोट्यधीश

इडाथोडिका, लिंगडोह ठरले कोट्यधीश

‘आयएसएल’च्या नव्या मोसमातील सर्वाधिक मोठा व्यवहार

मुंबई - इंडियन सुपर लीगच्या (आयएसएल) नव्या मोसमासाठी रविवारी झालेल्या स्थानिक खेळाडूंच्या ‘ड्राफ्ट’ व्यवहारात बचावपटू अनास इडाथोडिका, मध्यरक्षक युगेन्सन लिंगडोह यांना सर्वाधिक १.१ कोटी रुपये मिळाले. 

‘आयएसएल’मध्ये नव्याने समावेश झालेल्या जमशेदपूर एफसीने इडाथोडिकाला, तर दोन वेळच्या विजेत्या ॲटलेटिको कोलकता संघाने खरेदी केली. अन्य सर्वाधिक मोठ्या व्यवहारात गोलरक्षक सुब्रत पॉल याला जमशेदपूरने ८७ लाख रुपयाला खरेदी केली. दिल्लीने प्रीतम कोटलसाठी ७५ लाख रुपये मोजले. 

‘आयएसएल’मध्ये पदार्पण करणाऱ्या बंगळूर एफसीचे ‘आय-लीग’मधील प्रशिक्षक असणाऱ्या ॲशले वेस्टवूड यांनी सुरवातीपासून लिंगडोहला आपल्या रडारवर ठेवले होते. त्यांनी त्याची निवड करण्यास भार पाडताना फ्रॅंचाईजीला हात सैल सोडण्यास भार पाडले. वेस्टवूड आता ॲटलेटिकोचे तांत्रिक संचालक आहेत. त्यांनी आपल्या मार्गदर्शनाखाली आय-लीगमध्ये खेळणाऱ्या रॉबिन सिंगलादेखील ॲटलेटिकोकडे ओढले. 

एडाथोडिका याला सर्वाधिक किंमत मोजणाऱ्या जमशेदपूर संघाचे मुख्य प्रशिक्षक स्टिव्ह कॉपेल म्हणाले,‘‘भारतीय खेळाडूंची निवड करणे याला माझे प्राधान्य होते. आम्ही त्याच्यासाठीच प्रयत्न केले. एडाथोडिका याला सर्वाधिक किंमत मोजण्याचा फटका आम्हाला निश्‍चित बसणार नाही. परदेशी खेळाडूंविषयी आम्ही लवकरच विचार करू.’’

फुटबॉल स्पोर्टस डेव्हलपमेंट कंपनीच्या कार्याध्यक्षा नीता अंबानी म्हणाल्या, ‘‘आयएसएलमुळे देशातील युवकांना फुटबॉलमध्येही कारकीर्द घडू शकते असा विश्‍वास दिला. यंदा मोसम मोठा असला तरी, खेळाडूंना पुरेशी विश्रांती मिळेल याची काळजी घेतली जाईल. त्यामुळे खेळाडूंच्या खेळातील दर्जा अखेरपर्यंत कायम राहण्यास मदत होईल.’’ यंदा आयएसएल पूर्वीच्या अडीच महिन्यांच्या कालावधीऐवजी तब्बल पाच महिने चालणार आहे. तसेच, ६१ ऐवजी या वेळी ९५ सामने होणार आहेत.

अन्य महत्त्वपूर्ण व्यवहार
मुंबई सिटीकडून बलवंतसिंगची (६५ लाख) तिसऱ्या, तर अरिंदम भट्टाचार्यची (६४ लाख) चौथ्या फेरीत खरेदी
रिनो अँटोसाठी केरळा ब्लास्टर्सचे ६३ लाख
बंगळूर एफसीने लेनी रॉड्रिगेजसाठी मोजली ६० लाख
प्रणॉय हलदर (५८ लाख), नारायण दास (५८ लाख) एफसी गोवाकडे
टोनी सिंगला चेन्नईयनकडून मिळाले ५७ लाख

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com